Trending:


Mumbai Rain : तानसा तलाव वाहू लागला

मुंबई : पुढारी वृत्तसेवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या पाच तलावांपैकी तानसा तलाव आज (बुधवार) सायंकाळी ४.१६ वाजता ओसंडून वाहू लागला. धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. (Mumbai Rain) Mumbai Rain : मुंबईत पावसाळी वातावरण मात्र पावसाचा जोर कमी ! तानसा तलावात १४,४...


तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

रायचंद शिंदे, प्रतिनिधी पंढरपूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय पूजा पार पडली. यावेळी त्यांनी सलग तिसऱ्यांदा महापूजा करण्याचा मान...


US President Joe Biden withdraws from US presidential election race: जो बायडेन यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार

US presidential election: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाजूला होत असल्याचं स्पष्ट केलं आहे.


ABP Majha Headlines : 9AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 24 July 2024 : ABP Majha

ABP Majha Headlines : 9AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 24 July 2024 : ABP Majha मध्य रेल्वेची वाहतूक सुरु, ओव्हरहेड वायरवर पडलेला बांबू हटवण्यात यश, मात्र वाहतूक अर्धा तास उशिराने पूजा खेडकरांच्या आई-वडिलांचा कागदोपत्रीच काडीमोड, पुरावे एबीपी माझाच्या हाती, नॉन क्रिमिलेअरचा लाभ घेण्यासाठी घटस्फोटाचा बनावपूजा खेडकरांना दिव्यांगाचं प्रमाणपत्र देणारे चौकशीच्या फेऱ्यात, खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांसह मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यतावायव्य मुंबईच्या निकालावर सुनावणी घेण्यास न्या. सोनक यांच्या खंडपीठाचा नकार, दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश, भरत शाहाचं रविंद्र वायकरांच्या विजयाला आव्हानराज्य मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार आणि गिरीश महाजनांची खडाजंगी, एबीपी माझाला सूत्रांची माहिती, ग्रामविकास विभागाला वाढीव निधी मागताच अजित पवार आक्रमकसंसदेच्या दोन्ही सभागृहात आज अर्थसंकल्पावर चर्चा तर इंडिया आघाडीचं संसदेत अर्थसंकल्पाविरोधात आंदोलन


Pandharpur| पंढरपूरात वैष्णवांची मांदियाळी

Maharashtra , Ashadi Ekadashi, Ashadi Ekadashi 2024, Pandharpur, Vitthal Rukmini Temple , Pandharpur Crowded By Vishnavs


Microsoft security system मध्ये बिघाड, विमानसेवा, बँका बंद

मुंबई : 2024 मधील सर्वात मोठं संकट पहिल्यांदाच आलं आहे. Microsoft security system यंत्रणेत मोठा बिघाड झाला आहे. यामुळे बँका, विमानतळावरील सर्व यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. जिथे जिथे मायक्रोसॉफ्टचा वापर होतो अशा सर्व संस्थांमध्ये अडचणी येत असल्याने तिथली यंत्रणा ठप्प झाली आहे. मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाल्याने मोठा परिणाम झाला आहे.विमानतळावरील सर्व्हर डाऊन झाला आहे. जगभरातील बँक सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवरही झाला आहे....


MPSC मंत्र : भूगोल घटक –गट ब अराजपत्रित सेवा मूख्य परीक्षा

गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षेच्या पेपर दोनमधील भूगोल घटकाची तयारी कशी करावी ते या लेखामध्ये पाहू.


NITI Aayog Restructuring : मित्रपक्षांचे वजन वाढलं, NITI आयोगाची पुनर्रचना, इतक्या मंत्र्यांचा समावेश

NITI Aayog Restructuring : केंद्र सरकारने नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत मित्रपक्षांच्या सदस्यांना महत्व देण्यात आले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून देण्यात मित्र पक्षांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भाजप आपल्या मित्रपक्षांची विशेष काळजी घेत आहे.


Shambhuraj Desai : मी गोपनीयतेची शपथ घेतलीय, काही बोलणार नाही; अजित पवार-गिरीश महाजनांच्या वादावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया

मुंबई: मी मंत्रिपद स्वीकारताना गोपनीयतेची शपथ घेतली होती, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झालं हे सांगणार नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधीच्या मागणीवरून अजित पवार (Ajit Pawar) आणि गिरीश महाजनांचा वाद झाल्याची माहिती आहे. त्यावर बोलताना शंभुराज देसाईंनी ही सावध प्रतिक्रिया दिली. आपल्या खात्याला अधिकचा निधी द्यावा अशी मागणी गिरीश महाजनांनी अजित पवारांकडे केली...


Majhi Ladki Bahin Yojana 2024 : धुळे जिल्ह्यात 2 लाखांवर महिलांची नोंदणी


Budget 2024 : सुधारणांची संधी गमावली…

बिहार व आंध्र प्रदेशमधील प्रादेशिक पक्षांच्या समर्थनावर मोदी सरकार स्थापन झालेले आहे. साहजिकच त्यांच्या जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करण्यावर अर्थमंत्र्यांनी भर दिलेला आहे.


Gopal Krishna Maharaj : निरुपणकार गोपाळकृष्ण महाराज यांचं निधन, भजन गात असताना मंचावर कोसळून मृत्यू

निरुपणकार गोपाळकृष्ण महाराज यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल जाला आहे.


Mumbai Goa Highway Block: मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून 2 दिवस ब्लॉक, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Mumbai Goa Highway Block: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा दोन दिवस दिवसातून चार तास बंद राहणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीतील पुई म्हैसदरा पुलाचं काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. या पुलावरील लोखंडी गर्डर बसविण्याकरिता महामार्गावर आज आणि उद्या असा दोन दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे.


Kolhapur Flood | दूधगंगा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज (दि.२४) पाण्याने सरासरी पाणी पातळी गाठलेली आहे. जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पुढील चोवीस तासांमध्ये धरण पायथा विद्युत निर्मिती केंद्र सुरु करून नदीमध्ये १६०० घनफूट प्रतिसेकंद ...


Sasoon Hospital Special Report : ससुनमधील प्रकरण कसं उघडकीस आलं? एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट

पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार करून रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून येत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी हा व्हिडिओ समोर आणून ससुन रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्री गुपचूप निर्जनस्थळी सोडून देत असल्याचा आरोप केलाय. ‌ ज्यांनी हा सगळा ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला.


IPS Officers Transfer : राज्यातील चार आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई : राज्य पोलीस दलातील चार आयपीएस अधिकार्‍यांच्या मंगळवारी (दि.२४) गृहविभागाकडून बदल्या करण्यात आल्या. त्यात शशिकांत महावरकर यांची पिंपरी-चिंचवडच्या सहपोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. Jalgaon Police Promotion | जळगाव जिल्हयातील पोलीस अंमलदाराची पदोन्नती काही दिवसांपूर्वीच राज्य पोलीस दलातील काही आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या...


Sharad Pawar on Sunetra Pawar बारामतीत सुनेत्रा पवारांना मतं का मिळाली नाहीत? पवारांनी गणित सांगितलं

Sharad Pawar on Sunetra Pawar बारामतीत सुनेत्रा पवारांना मतं का मिळाली नाहीत? पवारांनी गणित सांगितलं ही बातमी पण वाचा Sunetra Pawar at Modibaug: सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या? शरद पवारांना भेटल्या का? अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण मुंबई: छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अशातच मंगळवारी अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार पुण्यातील मोदीबागेत (Modibaug) पोहोचल्याने राजकीय वर्तुळाला दुसरा धक्का बसतो की काय, असे वाटत होते. त्या अचानक शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला का पोहोचल्या, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या मोदी बागेत शरद पवार यांच्या भेटीला गेले नसल्याचे समोर आले आहे. याबाबत अजित पवार यांच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले आहे. सुनेत्रा पवार नीता पाटील यांना भेटायला गेल्या होत्या . अजित पवारांची (Ajit Pawar) बहीण नीता पाटील मोदीबागेत बी विंग मध्ये पाचव्या मजल्यावर राहतात . त्यांना भेटण्यासाठी सुनेत्रा पवार गेल्या होत्या, असे सुरज चव्हाण यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांची खासदारपदी बिनविरोध निवड झाली होती. या सर्व घटनाक्रमानंतर सुनेत्रा पवार आज खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यातील शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या मोदीबागेत दाखल झाल्या होत्या. सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये दाखल झाल्या तेव्हा शरद पवार, सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.


Pandharpur Wari 2024 Live Updates : विठ्ठल - रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

Ashadhi Ekadashi Pandharpur Vitthal Mahapuja Coverage Live Updates : पंढरपुरातील वातावरण विठुमय झालाय. हरीनामा जप आणि विठ्ठल भक्तांनी पंढरपुरीनगरी नटलीय. संतांच्या पालख्या इंद्रायणी काठी विसावल्या असून टाळ मृदंग, भजन, कीर्तनाने विठूनगरी दुमदुमली आहे. या आनंदवारी आषाढी सोहळ्याची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर


Ajit Pawar Vs Girish Mahajan :कॅबिनेट बैठकीत अजित पवार आणि गिरीश महाजनांमध्ये खडाजंगी

Ajit Pawar Vs Girish Mahajan :कॅबिनेट बैठकीत अजित पवार आणि गिरीश महाजनांमध्ये खडाजंगी राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारची बैठक वादळी ठरली.. आजच्या बैठकीत अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.. एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिलीय..ग्रामविकास विभागाला जास्त निधी देण्याची मागणी गिरीश महाजन यांनी अजित पवारांकडे केली.. त्यावर अजित पवार चांगलेच आक्रमक झाले.. निधी कुठून आणू, आता जमिनी विकायच्या का असं अजित पवार म्हणाले..त्यानंतर गिरीश महाजनांनी अजित पवारांना पुन्हा घेरण्याचा प्रयत्न केला.. सिन्नर तालुक्यातल्या एका स्मारकासाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद कशी करण्यात आली असा सवाल गिरीश महाजनांनी विचारला


IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर गेल्या कुठे? दिल्ली क्राईम ब्रँचकडून अटकेची टांगती तलवार

पुणे : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) नॉट रिचेबल असून पुणे पोलिसांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात मानसिक छळवणुकीची तक्रार दिली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन वेळा नोटीस देऊन सुद्धा पूजा खेडकर उपस्थित राहिल्या नाहीत. पूजा खेडकर यांच्या विरोधात दिल्ली क्राईम ब्रँचने गुन्हा दाखल केला असून त्या...


...म्हणून जरांंगेंनी उपोषण सोडलं, लक्ष्मण हाकेंनी सांगितलं ते कारण

सुरेश जाधव, प्रतिनिधीबीड:राज्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी विरूद्ध मराठा असा टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो आहे. मनोज जरांगेंनी आपल्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केलं आहे. त्याचा पाचवा दिवस आहे. तर दुसरीकडे पुणे न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही काढले आहे.तर ओबीसी आरक्षण बचावचे नेते लक्ष्मण हाकेंनी देखील ओबीसी जनआक्रोश यात्रा काढली आहे. हाकेंच्या यात्रेला देखील ओबीसी समाजाचा चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. आता...


बावनकुळे म्हणतात पुढचे सरकार भाजपच्याच नेतृत्वात

विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच महायुतीत पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत घटक पक्षाकडून दावे,प्रतिदावे सुरू झाले आहे.


Lokmanya Tilak Statue : एका पुतळ्याचं मनोगत, माझी हक्काची जागा मला कधी मिळणार?

Lokmanya Tilak : डोंबिवलीतला सुशोभीकरणासाठी हटवण्यात आलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा अद्यापही उभारण्यात आलेला नाही, त्यानिमित्ताने हा विशेष लेख


Radhanagari Dam : राधानगरी धरण ९४ टक्के भरले

राधानगरी : नंदू गुरव राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरण 94 टक्के भरले आहे. धरण 347.50 फूट पाणी पातळी झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने भरते. पावसाचा जोर कायम राहिल्यास आज धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचालित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. सध्याची पुरस्थिती पाहता नंदिकाठच्या ...


Supreme Court On NEET Exam : नीटची फेरपरीक्षा नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

नीट परीक्षा आणि त्या संदर्भातील कथित घोटाळ्याने देश हादरला आहे. या बाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बऱ्याच जणांना या परीक्षेत मिळालेले गुण संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. गुजरात मधील एका मुलीला पडलेल्या गुणांबद्दल संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याबद्दल दाखल झालेल्या याचिकेत तिने परीक्षा दिलेल्या बेळगाव येथील परीक्षा केंद्राचा मुद्दा पुढे आला आहे. यामुळे आता नीट परीक्षेच्या घोटाळ्यात बेळगाव येथील परीक्षा केंद्रही सर्वोच्च न्यायालयाच्या रडारवर आले आहे. गुजरात येथील एका मुलीने बेळगाव मधील परीक्षा केंद्रावर नीटची परीक्षा दिली होती. यामध्ये तिला 705 गुण मिळाले. आणि विशेष म्हणजे ही मुलगी बारावी परीक्षेत नापास झाली असून मुलीला नीट मध्ये 705 गुण कसे मिळाले. असा याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात प्रश्न उपस्थित केला आहे. या संदर्भात आढावा घेताना संबंधित परीक्षा केंद्राचा सक्सेस दर काय आहे असा प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारला असता, त्याचे उत्तर केवळ सहा टक्के असे आले आहे. यामुळे त्या परीक्षा केंद्रात परीक्षा दिलेल्या एकूण परीक्षार्थी पैकी फक्त सहा टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये त्या मुलीचा समावेश आहे .आता यापुढील न्यायालयीन चौकशीत जे काही निष्पन्न होणार आहे त्याकडे संपूर्ण कर्नाटकाचे आणि बेळगाव जिल्ह्याचेही लक्ष लागले आहे. संबंधित परीक्षा केंद्र नेमके कुठे होते आणि तेथे कोणते गैरप्रकार झाले याची चौकशी आता न्यायालयीन आदेशानुसार होणार आहे. न्यायालयीन कामकाजा संदर्भात बातमी देणाऱ्या लाईव्ह लॉ या वेबसाईटनेही या संदर्भात भाष्य केले असून यामुळे बेळगाव येथील परीक्षा केंद्राची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.


Raigad News | रायगडात सर्पदंश, विंचवांचा डंख वाढला

रायगड ः रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील आसलवाडी येथील एक शेतकरी महिला सर्पदंशाने नुकतीच दगावली. जिल्ह्यात सर्प, विंचूसह विविध विषारी दंशाने मृत्यूच्या घटना घडत आहेत. जिल्ह्यात सर्प, विंचू दंशाचे प्रमाण वाढतच आहे. यावर्षी मे, जून आणि 15 जुलैपर्यंतच्या अडीच महिन्यात रायगड जिलह्यात 1633 जणांना सर्प, विंचूसह विविध प्रकारचे दंश झाले आहेत. जिल्ह्यात महाड, मा...