Raj Thackeray Full Speech : शिंदे, ठाकरे ते शरद पवार; एकाच भाषणात सगळ्यांना डिवचलं! ABP MAJHA
Raj Thackeray Full Speech : शिंदे, ठाकरे ते शरद पवार; एकाच भाषणात सगळ्यांना डिवचलं! ABP MAJHA राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची सर्वदुर चर्चा आहे, या योजनेवरून अनेकदा विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे, अशातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे पुढच्या दोन महिन्यात बंद होतील, असं म्हणत महायुती सरकारचे वाभाडे काढले आहेत. मेळाव्यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, आज ते लाडकी बहीण योजनेचे पैसे देत आहेत, कोणी मागितले होते ते, मला आपल्या इतकच्या राजकारण्यांचा उद्देशच कळत नाही. हेतूच कळत नाही, तुमच्याकडे कोणी मागितले होते पैसे असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. काय म्हणालेत राज ठाकरे? पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, आज मी तुम्हाला लिहून देतो, लाडकी बहीण योजना आहे ना त्याचे, गेल्या काही महिन्यांचे पैसे येतील कारण निवडणुका तोंडावर आहेत. या देखील महिन्याचे पैसे येतील. पुढच्या महिन्याचे येतील नंतर येणार नाहीत. यावरती जाऊ नका तुम्ही. हे जे पैसे वाटणं सुरू आहे. त्यावरून जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात अशी परिस्थिती निर्माण होईल, या महाराष्ट्र सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील. कोण मागतंय त्यांच्याकडे फुकटं, महिलांच्या हाताला काम द्या, त्या कमवतील पैसे, त्या बळकट आहेत, त्यांच्या हाताला काम द्या, कोणी मागितले आहेत फुकटं पैसे, गरीबाला पैसे, मजुराला पैसे, शेतकऱ्यांना वीज फुकट द्या, शेतकरी कुठे मागतोय फुकटं वीज ते फक्त विजेत सातत्य मागत आहे, राज्यात कोणीच फुकट काही मागत नाही, यांना त्या सवयी लावायच्या आहेत. एकदा का फुकट घेण्याची सवय लागली की, मग सगळे राजकीय पक्ष त्या पध्दतीने वागायला लागतात. त्यानंतर सर्वजण त्या प्रकारच्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवत जातात. नागडा होणार आहे महाराष्ट्र. आपण राज् म्हणून काही विचार करणार आहोत की नाही, या सर्वातून हाताला काही लागणार नाही, असंही राज ठाकरेंनी यांनी यावेळी म्हटलं आहे.
2024-10-13T08:39:06Z
Aaditya Thackeray Dasara Melava Speech : आजोबांची आठवण, शिंदेंची मिमिक्री; आदित्य ठाकरेंचं भाषण
मुंबई: गेल्या दोन वर्षांमध्ये मुंबईत एकतरी नवा रस्ता झाला नाही. मध्यंतरी कोणीतरी म्हणत होतं, गेल्या दोन वर्षांत आणि म्हणोन... आणि म्हणोन... शर्ट खाली खेचत कोणीतरी भाषण करत होतं, अशा शब्दांत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करत त्यांची खिल्ली उडवली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते शनिवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava 2024) व्यासपीठावरुन बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी, '...आणि म्हणोन, आणि म्हणोन...' बोलत राज्यात धार्मिक आणि जातीय दंगली करत लोकांना व्यग्र ठेवले. हे सरकार रोज खोके खात आहे, भ्रष्टाचार करत आहे. मुंबईत 6000 कोटी रुपयांचा रस्ते घोटाळा झाला. मी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगतो की, या प्रकल्पाच्या फाईलवर सही करु नका. अन्यथा एका महिन्यात आमचं सरकार येत आहे. तुम्हाला आत राहायचं आहे की बाहेर राहायचं आहे, हे तुम्हीच ठरवा, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. शिंदे सरकारने आनंदाचा शिधा, शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश या सगळ्यात भ्रष्टाचार केला. शिंदे सरकार जेव्हा दावोसला गेले तेव्हा चार दिवसांत 45 कोटी रुपये उडवून आले. आम्ही दाव्होस आर्थिक परिषदेला गेलो होतो तेव्हा महाराष्ट्रात 80 हजार कोटींची गुंतवणूक आणली होती, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
2024-10-12T15:53:52Z