पनवेल: कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या साडेपाचशे कोटीच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार व कर्नाळा बँकेचे माजी संचालक विवेकानंद पाटील तरूंगात आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मनीष पितळे यांच्या कोर्टाने गुरूवारी (दि.१) त्यांना जमीन मंजूर केला. काही अटी-शर्थी घालत हा जमीन मजूर करण्यात आला आहे. विवेकानंद पाटील यांच्या बाजूने वकील राहुल ठाकूर यांनी युक्तिवाद केला.
Patra Chawl land scam case : संजय राऊतांना मोठा दिलासा, पत्राचाळ प्रकरणात जामीन मंजूरकर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या साडेपाचशे कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील ३६ महिने तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्यांच्यावर ५६० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुरूवारी या ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झाला. जामीन जरी मजूर झाला असला तरी, आरोपी विवेकानंद पाटील यांना सुटकेसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण साडेपाचशे कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांपैकी ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना जमीन मजूर झाला. परंतु सीआयडी ने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी जामीनावर निर्णय बाकी असल्याने आरोपी विवेकानंद पाटील यांचा मुक्काम तुरुंगातच असणार आहे.
2024-08-01T19:48:14Z