JALGAON ACCIDENT : लक्झरी बस पुलावरून कोसळून महिला ठार; ९ जखमी

जळगाव : इंदौर येथे धार्मिक कार्यक्रम करून कुटुंबीय जळगावला परतत असताना लक्झरी बस मोर नदीच्या पुलावरून उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात वृद्ध महिला जागीच ठार झाली तर ९ जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि.६) सकाळीच्या सुमारास घडली. फरीदा शब्बीर हुसेन इझी (वय ६५, रा.भवानी पेठ, जळगाव) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, फक्रुद्दीन शब्बीरभाई इझी हे आपल्या परिवारातील सदस्यांसह शनिवारी (दि.५) इंदौर येथे गेले होते. कार्यक्रम आटपून परत शनिवारी रात्री ते जळगावला लक्झरी बसने येत होते. आमोदा गावाजवळील मोर नदीवर बस आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस पुलावरून खाली कोसळली. या अपघातात फरीदा इझी यांचा जागीच मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले.

School Bus Accident: चंदनापुरी घाटात स्कूल बस उलटून सहा विद्यार्थी जखमी

फक्रुद्दीन इझी शब्बीरभाई इजी (वय ४३), शिरीन फक्रुद्दीन इझी (वय ३०), ताहेर फक्रुद्दीन इझी (वय १३), बुरहानुद्दीन फक्रुद्दीन इजी (वय १३), फातेमा मूर्तजा इझी (वय ३३), इनसिया मूर्तजा इझी (वय ६), जहरा अली असगर जकी (वय १२) चालक लखन हिरालाल यादव (वय ३०,रा. सब्जी मंडी गल्ली, तिलक नगर, इंदोर, मध्य प्रदेश) यांच्यासह क्लिनर (नाव समजू शकले नाही) अशी जखमींची नावे आहेत.

घटनेनंतर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेत बचावकार्य सुरु केले. त्यानंतर फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात खाजगी रुग्णालयात दाखल केले. तर मयत फरीदा इझी यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. यावेळी रुग्णालयात ईजी परिवाराने केलेला आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता. याप्रकरणी चालक लखन हिरालाल यादव (वय ३०,रा. सब्जी मंडी गल्ली, तिलक नगर, इंदोर, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Sambhajinagar Car Accident : मंदिरात १५ वर्षे अखंड सेवा; शेवाळेंचा पायरीवर दुर्दैवी अंत

2025-07-06T15:26:18Z