Maharashtra News: देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रात पुन्हा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मंगळवारी (4 फेब्रुवारी) राज्य सरकारने 13 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील आदेश जाहीर केला आहे. या आदेशानुसार पर्यावरण विभागातून बदली झाल्यापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले प्रवीण दराडे यांना सहकार आणि पणन विभागात प्रधान सचिव म्हणून नियुक्त केले आहे.
सध्या सहकार विभागाचा अतिरिक्त कार्यभार नियोजन विभागाचे अथिरिक्त मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांच्याकडे आहे. जाणून घ्या 13 अधिकाऱ्यांमध्ये कोण-कोण आहे आणि त्यांची कोणत्या ठिकाणी बदली झाली आहे.
अधिकाऱ्याचे नाव - प्रवीण दराडे
सध्याचे पद - नियुक्तीच्या प्रतीक्षेत
बदलीनंतरचे पद - प्रधान सचिव, सहकार आणि पणन विभाग
अधिकाऱ्याचे नाव - पंकज कुमार
सध्याचे पद - नियुक्तीच्या प्रतीक्षेत
बदलीनंतरचे पद - सचिव, सामान्य प्रशासन विभाग आणि विशेष चौकशी अधिकारी 2
हे पण वाचा : Mumbai Local : मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार; नव्या रचनेच्या लोकल धावणार, 300 फेऱ्या वाढणार
अधिकाऱ्याचे नाव - नितीन पाटील
सध्याचे पद - सचिव, राज्य मानवी हक्क आयोग
बदलीनंतरचे पद - आयुक्त, कौशल्य विकास विभाग, नवी मुंबई
अधिकाऱ्याचे नाव - श्वेता सिंघल
सध्याचे पद - राज्यपालांचे सचिव
बदलीनंतरचे पद - विभागीय आयुक्त, अमरावती
अधिकाऱ्याचे नाव - डॉ. प्रशांत नारनवरे
सध्याचे पद - विशेष चौकशी अधिकारी - २, सामान्य प्रशासन विभाग
बदलीनंतरचे पद - राज्यपालांचे सचिव
अधिकाऱ्याचे नाव - अनिल भंडारी
सध्याचे पद - सहमुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
बदलीनंतरचे पद - संचालक, माहिती तंत्रज्ञान विभाग
हे पण वाचा : 12 लाखांचे उत्पन्न टॅक्स फ्री नंतर आणखी एक आनंदवार्ता! RBI सर्वसामान्यांना गिफ्ट देणार, लवकरच घोषणा होणार
अधिकाऱ्याचे नाव - पी. के. डांगे
सध्याचे पद - आयुक्त, कौशल्य विकास विभाग
बदलीनंतरचे पद - सचिव, राज्य मानवी हक्क आयोग
अधिकाऱ्याचे नाव - एस. राममूर्ती
सध्याचे पद - सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण
बदलीनंतरचे पद - राज्यपालांचे उपसचिव
अधिकाऱ्याचे नाव - अभिजित राऊत
सध्याचे पद - जिल्हाधिकारी, नांदेड
बदलीनंतरचे पद - सहआयुक्त, राज्य कर विभाग, छत्रपती संभाजीनगर
हे पण वाचा : मंत्रिमंडळ निर्णय, 4 फेब्रुवारी 2025; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 'हे' महत्त्वपूर्ण निर्णय
अधिकाऱ्याचे नाव - मिलिंदकुमार साळवे
सध्याचे पद - सहआयुक्त, राज्य कर
बदलीनंतरचे पद - आयुक्त, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजीनगर
अधिकाऱ्याचे नाव - राहुल कर्डीलेसध्याचे पद - सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको
बदलीनंतरचे पद - जिल्हाधिकारी, नांदेड
अधिकाऱ्याचे नाव - माधवी सरदेशमुख सध्याचे पद - मुख्य कार्यकारी अधिकारी, कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्प
बदलीनंतरचे पद - संचालक, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण विभाग
अधिकाऱ्याचे नाव - अमित रंजन सध्याचे पद - सहायक जिल्हाधिकारी, गडचिरोली (चामोर्शी उपविभाग)
बदलीनंतरचे पद - प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (यवतमाळ, जिल्हा पांढरकवडा)
2025-02-05T04:55:18Z