HIGHWAY ACCIDENT RISK | महामार्ग खड्डेमय; अपघातांतचे मोठे भय!

कुडाळ : धो-धो कोसळत असलेल्या पावसाचा फटका वेताळबांबर्डे ब्रीज पणदूर येथे मुंबई-गोवा महामार्गाला बसला आहे. मुसळधार पावसाने गोव्याकडे जाणार्‍या लेनवरील डांबरीकरण खचून मोठमोठे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यात पावसाचे पाणी साचून डबकी तयार झाल्याने वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने तेथे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान, अलीकडेच तेथे हॉटमिक्स डांबरीकरणाने पॅचवर्क करीत खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र मुसळधार पावसाने पुन्हा खड्डे पडल्याने या दुरूस्तीच्या कामाची पोलखोल झाली आहे. तेथे लेनची दुर्दशा झाल्याने वाहतूक असुरक्षित बनली आहे. अल्पावधीतच या कामाची दयनीय अवस्था झाल्याने पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Kudal Road Incident | पावशी-घावनळे रस्त्यावर धोकादायक साईडपट्टीमुळे मोटरसायकलला अपघात

कुडाळ तालुक्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वेताळबांबर्डे पुलानजीक पणदूर हद्दीत आणि वेताळबांबर्डे तिठा ब्रीज अशा दोन ठिकाणी एकाच लेनवर वारंवार खड्डे पडत आहेत. चौपदरी महामार्गावरील ही समस्या दरवर्षीचीच झाली आहे. महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार प्रशासनाकडून हे खड्डे वारंवार बुजविले जातात.

Kudal News | कुडाळ येथे भक्तनिवास उभारण्यासाठी प्रयत्न करणार!

परंतु बुजविलेले खड्डे काही तासात पुन्हा डोके वर काढत असल्याने महामार्ग प्राधिकरणही हैराण होत आहे. या दोन्ही ठिकाणचे खड्डे मे महिन्यात बुजविण्यात आले होते. परंतु पाऊस सुरू होताच पुन्हा दोन्ही ठिकाणी खड्ड्यांनी डोके वर काढले. वेताळबांबर्डेतील खड्डे सिमेंट काँक्रिटच्या सहाय्याने दोन दिवसांपूर्वीच बुजविण्यात आले आहेत तर पणदूरमधील खड्ड्यांच्या भागात अलिकडेच हॉटमिक्स डांबरीकरण करून तेथील लेन वाहतुकीस सुरक्षित करून देण्यात आली होती.

गेले दोन दिवस कोसळणार्‍या मुसळधार पावसाचा फटका या लेनला बसला. पावसाने तेथील हॉटमिक्स डांबरीकरण उखडून पुन्हा खड्डे निर्माण झाले. वाहनांच्या रहदारीने खड्डे रुंदावून खड्ड्यांचे जाळेच निर्माण झाले आहे. त्यात पाणी साचून डबकी तयार होत असल्याने खड्ड्यांचा वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने तेथे अपघाताची भीती आहे.

महामार्गाच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करा....

दुचाकीस्वारांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे तेथील लेन वाहतुकीस धोकादायक बनली आहे. याकडे महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांनी लक्ष देऊन,या ठिकाणी वारंवार उखडणार्‍या महामार्गाच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून दर्जेदार दुरूस्ती करण्याची मागणी वाहनचालक आणि नागरिकांमधून होत आहे.

Kudal Drowning Incident | टाक न्हयचीआड येथील युवकाचा बुडून मृत्यू

निकृष्ट कामाची पुनरावृत्ती...

वारंवार एकाच ठिकाणी रस्ता खचत असतानाही त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना का केली जात नाही?

  • पॅचवर्कचा फार्स... पावसाळ्यात टिकणार नाही हे माहीत असूनही हॉटमिक्स डांबरीकरणासारखे तकलादू काम का केले जाते?

2025-07-05T23:25:10Z