GURU PURNIMA 2025 : यंदा 10 जुलैला गुरुपौर्णिमा! गुरुंना खास शुभेच्छा देऊन करा वंदन

Happy Guru Purnima 2025 Wishes in Marathi : आषाढी एकादशीनंतर येणाऱ्या पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. ही आषाढ पौर्णिमा गुरूपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते. पौराणिक मान्यतेनुसार सुमारे 3000 वर्षांपूर्वी वेद व्यासजींचा जन्म आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता. म्हणून दरवर्षी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वेद व्यासजींना समर्पित आहे.  गुरुपौर्णिमेला Facebook, Instagram, Twitter आणि WhatsApp Status च्या माध्यमातून खास मराठी गुरुंना वदन करण्यासाठी हे खास मराठी शुभेच्छा तुमच्या नक्की कामी येतील.  

  1. गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
  2. गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानशिवाय आत्मा नाही, ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म, सगळी आहे गुरुची देन, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
  3. जीवनाच्या प्रत्येक समस्येत तुमची असावी साथ डोक्यावर तुमचा हात असावा हीच इच्छा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
  4. ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान, गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
  5. खऱ्या खोट्याची ओळख पटवून देणाऱ्या महान गुरुंना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा...
  6. गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देन माझ्या सर्व गुरूंना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
  7. आपल्या गुरुची मूर्ती आपल्या मनात कायम असली की आपला मार्ग कधीच चुकत नसतो गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा...
  8. गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
  9. गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तया पाशी तुका म्हणा ऐंसे गुरु चरण त्याचे हृदयी धरू गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!
  10. गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण, लाख रुपये कमावूनसुद्धा, तुम्ही आहात त्याहून अनमोल, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
  11. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु , गुरुर देवो महेश्वरः, गुरुर साक्षात परम ब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः  
  12. गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा, गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा
  13. रुविण कोण दाखविल वाट, हा आयुष्याचा पथ हा दुर्गम,अवघड डोंगर घाट..!
  14. गुरु जगाची माऊली, सुखाची सुंदर सावली, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
  15. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या वळणावर काही ना काही शिकवलेल्या ज्ञानात भर पाडलेल्या सर्व गुरूंना धन्यवाद गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  16. "गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण नसे जगी सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया. आजच्या खास दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"
  17. गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम: गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा

2025-07-06T15:40:48Z