पणजी: गोवा मेडिकल कॉलेज (गोमेकॉ) च्या डॉक्टरांनी आरोग्यमंत्र्यांच्या अपमानास्पद वागणुकीचा तीव्र निषेध करत आज आंदोलन केले. भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए) च्या गोवा शाखेच्या वतीनं डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात गोमेकॉतील विभाग प्रमुख, निवासी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
Monsoon Hair Care Tips | पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी? जाणून घ्या सविस्तरआंदोलनकर्त्यांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना २४ तासांच्या आत जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे. अन्यथा पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली जाईल, असा इशारा दिला. डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना विविध मागण्या असलेले निवेदन देण्यात आले.
डॉक्टरांनी राणेंच्या वागणुकीवर आक्षेप घेतला असून त्यांनी व्हीआयपींचे फोन बंद करण्याची, तसेच गोमेकॉच्या कोणत्याही विभागात व्हिडिओ चित्रणास प्रतिबंध घालण्याची मागणी केली आहे. आजच्या आंदोलनामुळे गोमेकॉच्या सेवांवर परिणाम झाला आहे, कारण मोठ्या संख्येने रुग्णांना तपासणीसाठी येणे झाले होते, ज्यामुळे त्यांना विलंब सहन करावा लागला.
आंदोलनामुळे रुग्णांच्या सेवेत व्यत्यय आला असला तरी दुपारनंतर आंदोलकांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले आणि डीन डॉ. बांदेकर यांच्याशी चर्चा सुरू केली. या चर्चेत डॉ. कुट्टीकर यांनी निवेदन दिले, ज्यामध्ये त्यांनी सर्व मागण्यांचा समावेश केला आहे.
डॉ. कुट्टीकर यांनी आरोग्यमंत्र्यांवर आरोप केले की, त्यांनी ज्या ठिकाणी अपमान झालं तिथे जाऊन जाहीर माफी मागावी. यावर डॉ. राणे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांना डॉक्टरांचा आदर आहे, पण या गोष्टीत राजकारण न करता डॉक्टरांनी केवळ उपचार आणि मदतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) ने या घटनेचा निषेध केला असून मंत्र्यांनी डॉक्टरांच्या वागणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. आयटकचे सरचिटणीस ख्रीस्तोफर फोन्सेका यांनी याबाबत पत्रक जारी केले आहे.
2025-06-10T09:54:47Z