भिवंडी : भिवंडीत हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करणार्या पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने माहेरहून हुंड्यात पैसे कमी आणल्याने व फ्लॅट आणि गाडी दिली नसल्याने पतीसह सासरच्यांनी विवाहितेला सतत टोमणे मारण्यासह तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला माहेरी आणून सोडल्याची संतापनजक घटना नागाव परिसरातून समोर आली आहे.
याप्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या 6 जणांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती, सासू, सासरा, जेठ, जेठाणी, नणंद अशी गुन्हा दाखल झालेल्यांच्यात समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने सासरच्या घरी नांदत असताना जानेवारी 2023 ते 3 जुलै 2025 च्या कालावधीत माहेरहून हुंड्यात कमी पैसे आणल्याने तसेच माहेरच्यांनी फ्लॅट व गाडी दिली नाही, या कारणावरून सासरच्या मंडळीने संगनमताने पीडित विवाहितेला सतत टोमणे मारून शिवीगाळींसह दमदाटी करून मारहाण केली आहे. यासह पतीने पीडितेला तिच्या माहेरी सोडले असून तिला सासरी नांदण्यासाठी परत नेण्यासाठी येत नसल्याने विवाहितेने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
2025-07-06T10:39:36Z