बातम्या

Trending:


Jayant Patil Nashik | निवडून येण्याच्या भ्रमात राहू नका : जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

नाशिक : लोकसभेत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. पण निवडून येऊ अशा भ्रमात न राहता निवडणूकीच्या तयारीला लागावे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले. निवडणुकीत जिंकण्यासाठी उमेदवारी करायची असल्याचे सांगत निवडून येण्याची क्षमता असणा...


IPS Officers Transfer : राज्यातील चार आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई : राज्य पोलीस दलातील चार आयपीएस अधिकार्‍यांच्या मंगळवारी (दि.२४) गृहविभागाकडून बदल्या करण्यात आल्या. त्यात शशिकांत महावरकर यांची पिंपरी-चिंचवडच्या सहपोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. Jalgaon Police Promotion | जळगाव जिल्हयातील पोलीस अंमलदाराची पदोन्नती काही दिवसांपूर्वीच राज्य पोलीस दलातील काही आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या...


Maharashtra| विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंची रणनीती

Uddhav Thackeray Hold Meeting On Preparation Of Vidhan Sabha Election


Sassoon Hospital: 'रिक्षावाला 500 रुपयात...', रितेश गायकवाड यांनी सांगितला डॉक्टरांचा धक्कादायक प्रताप

Pune Sassoon Hospital : पुण्याच्या ससून रुग्णालयातील संतापजनक कारभार वारंवार उघडकीस येतात. आता तर बेवारस रुग्णांना चक्क रात्रीच्या वेळेस निर्जनस्थळी सोडून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.


Mamta Kulkarni Drug Case : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णीला हायकोर्टाचा दिलासा

Mamta Kulkarni Drug Case : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीनं (Mamta Kulkarni ) गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेतील कागदपत्रं गहाळ झाल्यानं अखेर हायकोर्टानं ममता कुलकर्णीला दिलासा देऊ केलाय. वर्ष 2016 मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अभिनेत्री ममता कुलकर्णीनं मुंबई उच्च न्यायालयात वर्ष 2018 मध्ये ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणातील काही कागदपत्रं गहाळ झाल्यानं त्यावर अनेक वर्ष...


Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 23 जुलै 2024: ABP Majha

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 23 जुलै 2024: ABP Majha कस्टम ड्यूटी कमी केल्यानं सोन्याच्या दरात मोठी घट, मुंबईत सोनं प्रतितोळा ५ हजार, पुणे 3 हजार तर जळगावात 2 हजारानं स्वस्त नवीन कररचनेत ३ ते ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के टॅक्स, करात १७ हजार ५००च्या घरात फायदा, तर स्टँडर्ड डिडक्शन 50 हजारांवरून 75 हजारांवर, मोबाईल फोन, चार्जर, सोलर सेट, इलेक्ट्रिक वाहनं, कॅन्सरची औषधं स्वस्त...तर प्लॅस्टिक उद्योगांवर कराचा बोजा वाढणार... महाराष्ट्र सरकारच्या धर्तीवर केंद्राचीही लाडका भाऊ योजना...५०० टॉप कंपन्यांमध्ये १ कोटी तरुणांना १२ महिन्यांची इंटर्नशीप...महिन्याला ५ हजार रुपये भत्ता... EPFO सदस्यांसाठी मोठी घोषणा... पहिल्यांदा पीएफ खाते सुरू करणाऱ्या नोकरदाराला तीन हप्त्यांत १५ हजार रुपये, १ लाख पगारपर्यंतची मर्यादा शेअर बाजारातल्या वर्षभरासाठी केलेली गुंतवणुक महागणार, १० ऐवजी साडे बारा टक्के कर लागणार, एनडीए सरकारसाठी पाठिंबा देणाऱ्या चंद्राबाबू नायडू आण नितीश कुमार यांना रिटर्न गिफ्ट, आंध्रच्या अमरावती राजधानीसाठी १५ हजार कोटी, बिहारला रस्त्यांसाठी २६ हजार कोटी केंद्राचं नवरत्न बजेट, मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमनं, मध्यमवर्गाला फायदा देत भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प, फडणवीसांकडून कौतुक केंद्राचं कुर्सी बचाओ बजेट, राहुल गांधींचा हल्लाबोल, काँग्रेसचा जाहीरनामा कॉपीपेस्ट केल्याची टीका, तर भाजपला महाराष्ट्राविषयी द्वेष असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं संधी दिली तर मी वडिलांविरोधात लढणार, नरहरी झिरवाळ यांच्या मुलाची भूमिका राधाकृष्ण विखे पाटील ऑनलाईन पालकमंत्री, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची हल्लाबोल, विखे-पाटलांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, मिटकरींची माहिती.


तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

रायचंद शिंदे, प्रतिनिधी पंढरपूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय पूजा पार पडली. यावेळी त्यांनी सलग तिसऱ्यांदा महापूजा करण्याचा मान...


Sanjay Raut Full PC : ते दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे; संजय राऊत यांचा हल्लाबोल

Sanjay Raut Full PC : ते दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे; संजय राऊत यांचा हल्लाबोल महाराष्ट्रावर अन्याय झालेला आहे महाराष्ट्रासाठी आमदारांनी आंदोलन करणं गरजेचं आहे महाराष्ट्रावर ८ लाखाचं कर्ज आहे अर्थमंत्री मह्णतात जमिनी विकून पैसे देऊ का महाराष्ट्राच्या जनतेने विचार करावा आम्ही अशा लोकांना उत्तर देत नाही महाराष्ट्रात काय चाललयं राज्यात १ फुल २ डाऊटफूलमध्ये संघर्ष सुरु आहे दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं झाले आहेत देवेंद्र फडणवीस अमित शाहांच्या मनातील सीएम नाहीत शिवसेना फोडल्याने शिंदेना मुख्यमंत्री पद महाराष्ट्राने शेतकर्यांना गरिबांना कीहीही दिलेले नाही सीमा भागात संघर्ष केल्याचा शिंदेनी पुरावा द्यावा सीमा भागाची जबाबादारी असताना सीएम तिकडे जात नाही .. अर्थसंकल्प गुजरातमधील इस्ट इंडिया कंपनीचा महाराष्ट्रातील राज्यकर्ते कौतुक करतात तर मग त्यांनी प्रमाणपत्र तपासून बघावी बिहारमधील पूर दिसला पण महाराष्ट्रातील पूर दिसला नाही देवेंद्र फडणवीस आकडेमोड करताना दिसले महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचे कर्ज आहे गिरीश महाजन यांनी निधी मागितला तर अजित पवार म्हणाले की जमीन विकून पैसे आणू का अमित शाह यांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधीच नव्हते महाराष्ट्राची अवस्था दिल्लीतील पायपुसने करुन ठेवली


Malaria Vaccine : सिरम इन्स्टिट्यूटची मलेरिया प्रतिबंधक लस आफ्रिकेत लाँच

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी संयुक्तपणे विकसित केलेली नवीन उच्च दर्जाची मलेरिया लस सोमवारी (दि. १५) अधिकृतपणे लाँच करण्यात आली. पश्चिम आफ्रिकेत 'R21/Matrix-M' लस वापरण्यास सुरुवात करणारा कोट डी'आयव्होर हा पहिला देश बनला आहे. गेल्या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) या लसीला मान्यता मिळाली होती. '...


Pooja Khedkar Special Report: पूजा खेडकरांसारखे आणखी किती अधिकारी?

Pooja Khedkar Special Report: पूजा खेडकरांसारखे आणखी किती अधिकारी? वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्या विरोधात तक्रार दिली होती पुणे पोलिसांनी २ वेळा नोटीस देऊन सुद्धा पूजा खेडकर उपस्थितीत राहिल्या नाहीत पुणे पोलिसांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही दिल्लीत गुन्हा दाखल झाल्याने अटकेच्या भीतीनं पूजा खेडकर नॉट रिचेबल असल्याची चर्चा


Manoj Jarange: अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, या कारणामुळे घेतली माघार

जालना: मराठा आरक्षणातील वेगवेगळ्या मागण्यासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी अखेरीस उपोषण सोडलं आहे. प्रकृती खालावल्यामुळे जरांगेंनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगेंनी उपोषण सोडलं. पण उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. सरकारने मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आता उपोषण सोडून लोकांमध्ये जाणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.(सविस्तर बातमी...


अग्रलेख : अधिक राजकीय!

परंतु ‘कॅपिटल गेन्स’वर अनाकलनीय करवाढ करणाऱ्या या अर्थसंकल्पात विकासाच्या नावाने कोणाचे भले केले जाणार आणि का, याचे उत्तर अर्थकारणाऐवजी सत्ताकारणात शोधावे लागेल...


Shatrughan Sinha : बजेटमधल्या त्या निर्णयाचं शत्रुघ्न सिन्हा यांना कौतुक, म्हणाले यामुळे सर्वसामान्यांना दिलासा...

Shatrughan Sinha on Union Budget 2024-25: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकार ३.० चा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर आता विरोधकांनी टीका केली आहे. टीएमसीचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी बजेटवर केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.


ठाण्यातील तरुणीचा पाकिस्तानातील तरुणासोबत निकाह, बनावट कागदपत्रांप्रकरणी तरुणीची चौकशी

महिलेने बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच तिच्या मुलीच्या नावाने बनावट जन्मदाखला आणि आधारकार्ड तयार केले.


MPSC मंत्र : भूगोल घटक –गट ब अराजपत्रित सेवा मूख्य परीक्षा

गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षेच्या पेपर दोनमधील भूगोल घटकाची तयारी कशी करावी ते या लेखामध्ये पाहू.


CTET Answer Key 2024 Released: CBSE कडून CTET ची उत्तरतालिका प्रसिद्ध, या लिंकवरून थेट डाउनलोड करा

CTET 2024 answer key Released CBSE to release provisional: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ७ जुलैला घेण्यात आली होती. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) निर्णयानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे


Gas Leak: रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत वायू गळती; 50 लोकांना बाधा?

खेड, रत्नागिरी:रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या लोटे एमआयडीसीमधील एका केमिकल कंपनीमधून वायू गळती झाली आहे. त्या परिसरात असणाऱ्या तलारेवाडी येथील 40 ते 50 ग्रामस्थांना वायू बाधा झाली आहे. त्यात लहान मुलं आणि महिलांचा देखील समावेश आहे. रूग्णांना रूग्णवाहिकेच्या माध्यमातून दवाखान्यात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर महिना भरातील ही दुसरी घटना असल्याने एमआयडीसीमधील एक्सल कंपनीसमोर ग्रामस्थानी गर्दी...


Nashik Crime News | 14 वर्षीय गतीमंद मुलीचा लैगिंक छळ करणाऱ्या महिलेस कारावास

नाशिक : उंटवाडीतील बालसुधारगृहात असलेल्या १४ वर्षीय गतिमंद मुलीवर लैंगिक छळ करणाऱ्या महिलेस न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. शोभा पगारे (रा. म्हसरुळ) असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिने ऑक्टोबर २०२० मध्ये मुलीस मारहाण करीत छळ केला होता. (Nashik Crime News) शोभा पगारे ही उंटवाडी येथील बाल निरीक्षण/बालगृह य...


Nepal Plane Crash Video | काठमांडूत टेकऑफ करताना विमानाचा मोठा अपघात, पहिला व्हिडिओ समोर

काठमांडूत टेकऑफ करताना विमानाचा मोठा अपघात, पहिला व्हिडिओ समोर


Mumbai Rain : तानसा तलाव वाहू लागला

मुंबई : पुढारी वृत्तसेवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या पाच तलावांपैकी तानसा तलाव आज (बुधवार) सायंकाळी ४.१६ वाजता ओसंडून वाहू लागला. धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. (Mumbai Rain) Mumbai Rain : मुंबईत पावसाळी वातावरण मात्र पावसाचा जोर कमी ! तानसा तलावात १४,४...


Gopal Krishna Maharaj : निरुपणकार गोपाळकृष्ण महाराज यांचं निधन, भजन गात असताना मंचावर कोसळून मृत्यू

निरुपणकार गोपाळकृष्ण महाराज यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल जाला आहे.


NITI Aayog Restructuring : मित्रपक्षांचे वजन वाढलं, NITI आयोगाची पुनर्रचना, इतक्या मंत्र्यांचा समावेश

NITI Aayog Restructuring : केंद्र सरकारने नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत मित्रपक्षांच्या सदस्यांना महत्व देण्यात आले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून देण्यात मित्र पक्षांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भाजप आपल्या मित्रपक्षांची विशेष काळजी घेत आहे.


V.N. Naik Sanstha Election | प्रचार अंतिम टप्प्यात; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, शनिवारी (दि. २७) मतदान होणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत चार पॅनल असल्याने जिल्ह्यातील राजकारणाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. मतदानाला चार दिवस राहिले असल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. क्रांतिवीर विकास पॅनलच...


Ashadhi Ekadashi | विठ्ठलाचरणी मुख्यमंत्र्यांचं साकडं... म्हणाले....

Ashadhi Ekadashi Pandharpur CM Eknath Shinde Wish To Lord Vitthal


Lokmanya Tilak Statue : एका पुतळ्याचं मनोगत, माझी हक्काची जागा मला कधी मिळणार?

Lokmanya Tilak : डोंबिवलीतला सुशोभीकरणासाठी हटवण्यात आलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा अद्यापही उभारण्यात आलेला नाही, त्यानिमित्ताने हा विशेष लेख


Budget 2024 : देशवासीयांच्या सर्वांगीण प्रगतीचा निर्धार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी केलेल्या भाषणातील संपादित भाग. मी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 साठी अर्थसंकल्प सादर करत आहे. भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास दाखवत त्यांना तिसर्‍या वेळी पुन्हा निवडून दिले. आमच्या धोरणांवर दाखवलेल्या विश...


Police Recruitment Scam | पोलिसांत भरती करण्याचे आमिष दाखवून साडेसोळा लाखांना गंडा

ओरोस : आपण सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात पीएसआय असून, पोलिस भरतीमध्ये तुमच्या मुलाला भरती करतो, असे सांगून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची १६ लाख ४७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी कोल्हापूर येथील संदीप बळवंत गुरव (३९, रा. संस्कार बंगला, शांती उद्यान, आपटेनगर, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीचा हा प्रकार १० जानेवारी २०२३...


Raigad News | रायगडात सर्पदंश, विंचवांचा डंख वाढला

रायगड ः रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील आसलवाडी येथील एक शेतकरी महिला सर्पदंशाने नुकतीच दगावली. जिल्ह्यात सर्प, विंचूसह विविध विषारी दंशाने मृत्यूच्या घटना घडत आहेत. जिल्ह्यात सर्प, विंचू दंशाचे प्रमाण वाढतच आहे. यावर्षी मे, जून आणि 15 जुलैपर्यंतच्या अडीच महिन्यात रायगड जिलह्यात 1633 जणांना सर्प, विंचूसह विविध प्रकारचे दंश झाले आहेत. जिल्ह्यात महाड, मा...


NEET-UG Exam 2024 : सर्वोच्च न्यायालयाने ‘या’ ५ कारणांमुळे NEET-UG परीक्षा पुन्हा घेण्यास दिला नकार

Supreme Court On NEET-UG 2024 : पेपर फुटल्याने संपूर्ण परीक्षेच्या पावित्र्यावर परिणाम होत असल्याचे दर्शविणारे कोणतेही पुरावे नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.