Trending:


Supreme Court On NEET Exam : नीटची फेरपरीक्षा नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

नीट परीक्षा आणि त्या संदर्भातील कथित घोटाळ्याने देश हादरला आहे. या बाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बऱ्याच जणांना या परीक्षेत मिळालेले गुण संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. गुजरात मधील एका मुलीला पडलेल्या गुणांबद्दल संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याबद्दल दाखल झालेल्या याचिकेत तिने परीक्षा दिलेल्या बेळगाव येथील परीक्षा केंद्राचा मुद्दा पुढे आला आहे. यामुळे आता नीट परीक्षेच्या घोटाळ्यात बेळगाव येथील परीक्षा केंद्रही सर्वोच्च न्यायालयाच्या रडारवर आले आहे. गुजरात येथील एका मुलीने बेळगाव मधील परीक्षा केंद्रावर नीटची परीक्षा दिली होती. यामध्ये तिला 705 गुण मिळाले. आणि विशेष म्हणजे ही मुलगी बारावी परीक्षेत नापास झाली असून मुलीला नीट मध्ये 705 गुण कसे मिळाले. असा याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात प्रश्न उपस्थित केला आहे. या संदर्भात आढावा घेताना संबंधित परीक्षा केंद्राचा सक्सेस दर काय आहे असा प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारला असता, त्याचे उत्तर केवळ सहा टक्के असे आले आहे. यामुळे त्या परीक्षा केंद्रात परीक्षा दिलेल्या एकूण परीक्षार्थी पैकी फक्त सहा टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये त्या मुलीचा समावेश आहे .आता यापुढील न्यायालयीन चौकशीत जे काही निष्पन्न होणार आहे त्याकडे संपूर्ण कर्नाटकाचे आणि बेळगाव जिल्ह्याचेही लक्ष लागले आहे. संबंधित परीक्षा केंद्र नेमके कुठे होते आणि तेथे कोणते गैरप्रकार झाले याची चौकशी आता न्यायालयीन आदेशानुसार होणार आहे. न्यायालयीन कामकाजा संदर्भात बातमी देणाऱ्या लाईव्ह लॉ या वेबसाईटनेही या संदर्भात भाष्य केले असून यामुळे बेळगाव येथील परीक्षा केंद्राची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.


Raigad News | रायगडात सर्पदंश, विंचवांचा डंख वाढला

रायगड ः रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील आसलवाडी येथील एक शेतकरी महिला सर्पदंशाने नुकतीच दगावली. जिल्ह्यात सर्प, विंचूसह विविध विषारी दंशाने मृत्यूच्या घटना घडत आहेत. जिल्ह्यात सर्प, विंचू दंशाचे प्रमाण वाढतच आहे. यावर्षी मे, जून आणि 15 जुलैपर्यंतच्या अडीच महिन्यात रायगड जिलह्यात 1633 जणांना सर्प, विंचूसह विविध प्रकारचे दंश झाले आहेत. जिल्ह्यात महाड, मा...


Narayan Survey Special Report : नारायण सुर्वेंचा फोटो पाहताच चोराचा माफीनामा

Narayan Survey Special Report : नारायण सुर्वेंचा फोटो पाहताच चोराचा माफीनामा आणि आता बातमी आहे सुप्रसिद्ध कवी आणि पद्मश्री नारायण सुर्वेंच्या घरातील चोरीची...नारायण सुर्वेंच्या नेरळ येथील घरात चोरी झाली.. आपण ज्या घरात चोरी करतोय ते घर कवी नारायण सुर्वेंचं असल्याचं समजताच चोराला पश्चाताप झाला. चोरी केलेल्या सर्व वस्तू परत करण्याची कबुली या चोराने दिली. तसं पत्र त्याने लिहिलंय. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली या ओळी नारायण सुर्वेंच्या कवितेच्या आहेत.. भाकरीचा चंद्र शोधण्याचा मार्ग चुकीचा असल्याची उपरती चोराला झाली आणि त्याने आपला गुन्हा कबुल करुन सर्व ऐवज परत करण्याची हमी दिली.. आज एका प्रामणिक चोरट्याचं महाराष्ट्राला दर्शन झालंय... आता तुम्ही म्हणाल चोरटा आणि प्रामाणिक कसा काय? तर त्याचं झालंय असं की एका चोरट्यानं एका मोठ्या कवीच्या घरावर डल्ला मारला.... आणि आपण कुणाच्या घरावर डल्ला मारलाय हे कळताच त्यानं चोरलेला सगळा मुद्देमाल जसाच्या तसा परत आणून दिला... कोण आहेत ते कवी आणि चोरट्यानं नेमकं काय केलं... पाहुयात ह्या रिपोर्टमधून...


NITI Aayog Restructuring : मित्रपक्षांचे वजन वाढलं, NITI आयोगाची पुनर्रचना, इतक्या मंत्र्यांचा समावेश

NITI Aayog Restructuring : केंद्र सरकारने नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत मित्रपक्षांच्या सदस्यांना महत्व देण्यात आले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून देण्यात मित्र पक्षांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भाजप आपल्या मित्रपक्षांची विशेष काळजी घेत आहे.


Sharad Pawar on Raj Thackeray : आठ-दहा दिवसांनी जेव्हा जाग येईल तेव्हा राज ठाकरे बोलतात

Sharad Pawar on Raj Thackeray : आठ-दहा दिवसांनी जेव्हा जाग येईल तेव्हा राज ठाकरे बोलतात पुणे : अवघ्या महाराष्ट्राला आज पंढरीच्यां (Pandharpur) पांडुरंगाचे आणि चंद्रभागेच्या तिरी जमलेल्या वैष्णवांच्या मेळ्याचे वेड लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केल्यानंतर सोशल मीडियावरही विठुरायाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत हेत. राज्यातील सर्वच बडे नेते आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राला आणि वारकऱ्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यासोबतच महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, समृद्धीसाठी आणि जनतेसाठी बा विठ्ठलाला साकडे घालत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना वारीची परंपरा आणि एकोप्यावर भाष्य केलं आहे. आत, शरद पवारांना (Sharad Pawar) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) ट्विटसंदर्भात विचारले असता, त्यांनी पवारस्टाईलने चिमटा काढला अन् एकच हशा पिकल्याचं दिसून आलं. राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरती उपोषणाला बसला आहे. जातीय तणावात सध्याचा महाराष्ट्र आणि ग्रामीण भाग पहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने राज ठाकरेंनी ट्विट करुन, ''आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे.'', असे म्हटले आहे. राज ठाकरेंच्या ट्विटच्या अनुषंगाने शरद पवार यांना पुण्यातील पत्रकार परिषदेतून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना, शरद पवारांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.


Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 24 जुलै 2024 : ABP Majha

Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 24 जुलै 2024 : ABP Majha Budget Indexation Benefits On Property Removed Tax: तुम्ही प्रॉपर्टी (Property) किंवा शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक केली असेल किंवा कुठेही गुंतवणूक (Investment) करायची असेल, तर तुम्हाला या बजेटमध्ये (Budget केलेले महत्त्वाचे बदल माहीत असणं आवश्यक आहे. सरकारनं या अर्थसंकल्पात Capital Gain Tax मध्ये बदल जाहीर केले आहेत. जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, Capital Gain Tax म्हणजे तुमच्या नफ्यावर लादलेला कर. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात Capital Gain Tax मध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. तसेच, इंडेक्सेशन बेनिफिटचा नियम काढून टाकला आहे, ज्याचा परिणाम प्रामुख्यानं रिअल इस्टेट व्यवहारांवर होऊ शकतो.


Vasai Crime News : बनावट औषधे बनवणाऱ्या कंपनीचा गोरखधंदा उघड; तब्बल 1 करोड 41 लाखांच्या औषधांसह मुद्देमाल जप्त

Vasai Crime News वसई : महाराष्ट्र सरकारच्या अन्न औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. यात बनावट औषधे बनवणाऱ्या कंपनीचा गोरखधंदा उघड करण्यात अन्न औषध प्रशासनाला (Food and Drug Administration) मोठे यश आले आहे. या कारवाईत तब्बल 1 करोड 41 लाखांच्या बनावट औषधांसह मोठ्या प्रमाणात इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 10 जुलै रोजी वसईच्या (Vasai Crime) गहरवार फार्मा प्रोडक्टस प्रा.लि. कंपनीवर धाड टाकून 1 करोड 41 लाखांची औषधे आणि त्याला लागणा-या...


Pandharpur| पंढरपूरात वैष्णवांची मांदियाळी

Maharashtra , Ashadi Ekadashi, Ashadi Ekadashi 2024, Pandharpur, Vitthal Rukmini Temple , Pandharpur Crowded By Vishnavs


CTET Answer Key 2024 Released: CBSE कडून CTET ची उत्तरतालिका प्रसिद्ध, या लिंकवरून थेट डाउनलोड करा

CTET 2024 answer key Released CBSE to release provisional: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ७ जुलैला घेण्यात आली होती. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) निर्णयानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे


Manoj Jarange Patil Maratha Reservation| मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले

पुढारी ऑनलाईन डेस्क पाच दिवसांनंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज बुधवारी त्यांचे उपोषण स्थगित केले. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनादरम्यान पोलिसांच्या लाठीहल्ल्यात ज्या महिला जखमी झाल्या होत्या त्यांच्या हातून फळांचा रस पिऊन तसेच आंतरवाली सराटीतील ग्रामस्थांच्या हातून पाणी पिऊन जरागेंनी उपोषण सोडले. दरम्यान, दोन द...


बळीराजाच्या उन्नतीसाठी जेएनपीएचा पुढाकार

उरण : राजकुमार भगत जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरण (जेएनपीए) कृषी मालावर आधारीत प्रक्रिया आणि साठवणूक केंद्र उभारणार असून केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जेएनपीएच्या प्रस्तावाला नुकतीच 19 जुलै 2024 रोजी मान्यता दिली. या प्रकल्पासाठी 285 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. अशा प्रकारची देशातील बंदरांमध्ये जेएनपीएने...


Shahu Maharaj | शाहू महाराजांकडून चिमुरडीला खास भेट, पाहा व्हिडीओ

Shahu Maharaj Gift Jacket to Little Girl video


धाराशिव : लाचखोर वैद्यकीय अधिकारी गजाआड, सहकाऱ्याची बिले काढण्यासाठी घेतली तीन हजाराची लाच

आपल्याच सहकारी असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे वैद्यकीय बिले काढण्यासाठी तसेच पगार, किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला गजाआड करण्यात आले आहे.


Sanjay Raut Full PC : ते दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे; संजय राऊत यांचा हल्लाबोल

Sanjay Raut Full PC : ते दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे; संजय राऊत यांचा हल्लाबोल महाराष्ट्रावर अन्याय झालेला आहे महाराष्ट्रासाठी आमदारांनी आंदोलन करणं गरजेचं आहे महाराष्ट्रावर ८ लाखाचं कर्ज आहे अर्थमंत्री मह्णतात जमिनी विकून पैसे देऊ का महाराष्ट्राच्या जनतेने विचार करावा आम्ही अशा लोकांना उत्तर देत नाही महाराष्ट्रात काय चाललयं राज्यात १ फुल २ डाऊटफूलमध्ये संघर्ष सुरु आहे दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं झाले आहेत देवेंद्र फडणवीस अमित शाहांच्या मनातील सीएम नाहीत शिवसेना फोडल्याने शिंदेना मुख्यमंत्री पद महाराष्ट्राने शेतकर्यांना गरिबांना कीहीही दिलेले नाही सीमा भागात संघर्ष केल्याचा शिंदेनी पुरावा द्यावा सीमा भागाची जबाबादारी असताना सीएम तिकडे जात नाही .. अर्थसंकल्प गुजरातमधील इस्ट इंडिया कंपनीचा महाराष्ट्रातील राज्यकर्ते कौतुक करतात तर मग त्यांनी प्रमाणपत्र तपासून बघावी बिहारमधील पूर दिसला पण महाराष्ट्रातील पूर दिसला नाही देवेंद्र फडणवीस आकडेमोड करताना दिसले महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचे कर्ज आहे गिरीश महाजन यांनी निधी मागितला तर अजित पवार म्हणाले की जमीन विकून पैसे आणू का अमित शाह यांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधीच नव्हते महाराष्ट्राची अवस्था दिल्लीतील पायपुसने करुन ठेवली


उपाध्यक्षपदाचा दावेदार

जेम्स डेव्हिड बाऊमन हे त्यांचे मूळ नाव. अमली पदार्थांच्या आहारी गेलेली आई आणि कुटुंबाला वाऱ्यावर सोडून गेलेले वडील अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले जेम्स यांना आजी-आजोबांनी वाढवले.


Maharashtra Cabinet Decisions : आशा सेविकांना अनुदान; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील ६ महत्त्वाचे निर्णय!

Maharashtra cabinet meeting : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.


Lote MIDC Gas Leak : लोटे एमआयडीसीतील एक्सेल कंपनीमध्ये वायू गळती

अनुज जोशी खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये एक दुर्घटना झाली आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लोटे औद्योगिक वसाहतीमधील एक्सेल कंपनीमध्ये प्रक्रिया सुरू असताना रसायन गळती झाली. त्याचा पावसाच्या पाण्यामध्ये संपर्क झाला. परिणामी तयार झालेल्या वायू नजीकच्या लोटे चाळकेवाडीमध्ये पसरल्याने काही जणांना या वायूची बाधा झाली. पाच ते सात ज...


Budget 2024 : देशवासीयांच्या सर्वांगीण प्रगतीचा निर्धार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी केलेल्या भाषणातील संपादित भाग. मी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 साठी अर्थसंकल्प सादर करत आहे. भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास दाखवत त्यांना तिसर्‍या वेळी पुन्हा निवडून दिले. आमच्या धोरणांवर दाखवलेल्या विश...


Lokmanya Tilak Statue : एका पुतळ्याचं मनोगत, माझी हक्काची जागा मला कधी मिळणार?

Lokmanya Tilak : डोंबिवलीतला सुशोभीकरणासाठी हटवण्यात आलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा अद्यापही उभारण्यात आलेला नाही, त्यानिमित्ताने हा विशेष लेख


BJP च्या वाईट कामगिरीसाठी NCP जबाबदार! RSS च्या 'विवेक'चा हल्लाबोल; म्हणाले, 'स्वतः फडणवीस..'

RSS Blames Ajit Pawar NCP For BJP Poor Show in Maharashtra: यापूर्वी संघाचे मुखपत्र 'ऑर्गनायझर'नेही राज्यातील पराभवाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडले होते. मात्र त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी सारवासारव केली होती.


Kolhapur Rain : पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल

कोल्‍हापूर : पुढारी वृत्‍तसेवा शहर आणि जिल्‍ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्‍टी सुरू आहे. त्‍यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. तसेच धरणांच्या पाणी साठ्यातही वाढ होत असून, अनेक धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्‍यातच पंचगंगा नदीची धोक्‍याच्या पातळीकडे वेगाने वाटचाल सुरू आहे.(Kolhapur Rain) जिल्‍ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सु...


राज्यभर पावसाचा कहर; पुणे, मुंबईसह याठिकाणी पुन्हा होणार जोरदार पाऊस, हवामान...

शिवानी धुमाळ, प्रतिनिधीपुणे : राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत आहे. काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुन्हा राज्यातील काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने नेमकं काय म्हटलं, हे आपण जाणून घेऊयात.मुंबईतील काही भागात पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई याठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात देखील...


V.N. Naik Sanstha Election | प्रचार अंतिम टप्प्यात; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, शनिवारी (दि. २७) मतदान होणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत चार पॅनल असल्याने जिल्ह्यातील राजकारणाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. मतदानाला चार दिवस राहिले असल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. क्रांतिवीर विकास पॅनलच...


Plane Crash : विमान कोसळण्याआधीचा 'तो' VIDEO आला समोर

काठमांडू : प्रवाशांनी भरलेलं विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांना घेऊन जाणारं विमान अचानक कोसळलं आणि परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक लोक आणि आपत्कालीन विभाग घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार क्रू मेंबर्ससह 19 प्रवासी या विमानाने प्रवास करत होते.नेपाळच्या काठमांडू परिसरात विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला आहे. विमान कोसळल्यानंतर आग लागली आणि...


Ulhasnagar Municipal Corporation | पहिल्याच दिवशी दोन कोटींचा भरणा

उल्हासनगर : यावर्षी मालमत्ता कर वसुलीचे 150 कोटींचे टार्गेट समोर ठेवणारे उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त डॉ.अजिज शेख यांनी करबुडव्यांना थकबाकी एकत्रित भरण्यासाठी पुन्हा एक संधी दिली आहे. त्यासाठी चालुवर्षी 22 ते 27 जुलै पर्यंत थकीत मालमता करावर 100 टक्के व्याज माफीची अभय योजना जाहीर केली आहे. त्यात पहिल्याच दिवशी थकबाकीदारांनी चांगला प्रतिसाद देऊन दो...


विखे विरुद्ध लंके वाद चिघळला

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नगरचे खासदार नीलेश लंके यांनी निवडून आल्यानंतर लगेचच महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.