ABP MAJHA TOP 10 HEADLINES : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जून 2025 | मंगळवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जून 2025 | मंगळवार 

1. आपली लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम, 26 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दिशा स्पष्ट केली https://tinyurl.com/5f9ztbjf  सात वर्षे पवारसाहेबांनी संधी दिली, आता मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करुन नव्या चेहऱ्याला संधी द्या, वर्धापनदिनी जयंत पाटील यांची मागणी, तर प्रमुख सहकाऱ्यांशी संवाद साधून निर्णय घेणार, शरद पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yzvf3uv5  भारताचं सर्व शेजाऱ्यांशी वाकडं, देशाच्या नेतृत्त्वाने सुसंवादाची स्थिती ठेवली नाही, शरद पवारांचा मोदींच्या परराष्ट्र धोरणावर हल्ला https://tinyurl.com/sazvsyhc 

2. काहीजण म्हणतात, अजितदादा निधी देत नाहीत, समाजकल्याणचा निधी वळवला, पण मी काय पैसे खिशातून देतो का? शिंदेंच्या आमदारांचे नाव न घेता अजितदादांचा टोला, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन उत्साहात https://tinyurl.com/3fwkn96y 

3. आमचा बाप बाळासाहेब ठाकरे, तुमचा कोण? मंत्रिमंडळाच्या बैठकीतच शिंदेंच्या मंत्र्यांची नितेश राणेंविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार https://tinyurl.com/398x5evu  तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना खडसावलं https://tinyurl.com/yjy2jc7y 

4. मनसे नेते प्रकाश महाजनांनी राणेंविरोधात थोपटले दंड, संभाजीनगरात येऊन मारून दाखवा, राणेंकडून धमक्या येत असल्याचा आरोप करताना आव्हान https://tinyurl.com/mu83y4bs  उलट्याचा अर्थ तुला माहितीय का, एकटा भेट, सांगतो, नारायण राणेंनी प्रकाश महाजनांना पुन्हा डिवचलं https://tinyurl.com/24a5hck5 

5. भाडे न वाढवता सर्व लोकल AC करणार, सर्वच लोकल ट्रेन्सना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा विचार, गर्दीच्या नियोजनासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळाही बदलण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांचा मुंबई लोकलसाठी मास्टर प्लॅन https://tinyurl.com/mmxaucfs 

6. महाराष्ट्रात मद्य महागलं, देशी दारु 80 रुपये तर महाराष्ट्र मेड दारु 148 रुपयांना मिळणार, भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर दीड टक्के अतिरिक्त उत्पादन शुल्क, राज्याच्या तिजोरीत 14 हजार कोटींची भर पडणार https://tinyurl.com/4xnkdww5 

7. मुंब्रा लोकल ट्रेनचा अपघात लोखंडी रॉडमुळे झाला असावा, मध्य रेल्वेला संशय https://tinyurl.com/3xvfarzy  ट्रेनमधून 13 जण पडल्यावर प्रवाशांनी चेन खेचली, पण लोकल थांबलीच नाही, जखमींना टेम्पोतून रुग्णालयात नेलं, वेळेत मदत मिळाली असती तर काही जीव वाचले असते, प्रत्यक्षदर्शी प्रवाशाची खंत https://tinyurl.com/2s3knaex 

8. सासरी होणार्‍या सततच्या छळाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल, बीडच्या आष्टीत वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती, पती, सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल https://tinyurl.com/427hu6e5  वीजेचा शॉक लागून शेतकरी पित्यासह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, जालना जिल्ह्यातील वरुड गावावर शोककळा https://tinyurl.com/2wtw82wd 

9. शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या रुग्णाकडून घेतली लाच, नाशिकच्या नामको कॅन्सर हॉस्पिटलमधील प्रकार उघड, वैद्यकीय अधीक्षक महिलेसह तिघींना अटक https://tinyurl.com/2wx2rjxx  चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी मेटाने माहिती पुरवली, नाशिकमध्ये एकाच वेळी 357 जणांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/26nesfyu 

10. पेरण्यांची घाई नको, 15 जून नंतरच मोसमी पाऊस पडणार, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन https://tinyurl.com/yc7fkdj7  महाराष्ट्रातील वातावरणात बदल, पुढील दोन दिवसात पावसाचा जोर वाढणार, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा अंदाज https://tinyurl.com/53tfz4jv 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

2025-06-10T12:56:48Z