Trending:


Mamta Kulkarni Drug Case : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णीला हायकोर्टाचा दिलासा

Mamta Kulkarni Drug Case : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीनं (Mamta Kulkarni ) गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेतील कागदपत्रं गहाळ झाल्यानं अखेर हायकोर्टानं ममता कुलकर्णीला दिलासा देऊ केलाय. वर्ष 2016 मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अभिनेत्री ममता कुलकर्णीनं मुंबई उच्च न्यायालयात वर्ष 2018 मध्ये ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणातील काही कागदपत्रं गहाळ झाल्यानं त्यावर अनेक वर्ष...


Supreme Court On NEET Exam : नीटची फेरपरीक्षा नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

नीट परीक्षा आणि त्या संदर्भातील कथित घोटाळ्याने देश हादरला आहे. या बाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बऱ्याच जणांना या परीक्षेत मिळालेले गुण संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. गुजरात मधील एका मुलीला पडलेल्या गुणांबद्दल संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याबद्दल दाखल झालेल्या याचिकेत तिने परीक्षा दिलेल्या बेळगाव येथील परीक्षा केंद्राचा मुद्दा पुढे आला आहे. यामुळे आता नीट परीक्षेच्या घोटाळ्यात बेळगाव येथील परीक्षा केंद्रही सर्वोच्च न्यायालयाच्या रडारवर आले आहे. गुजरात येथील एका मुलीने बेळगाव मधील परीक्षा केंद्रावर नीटची परीक्षा दिली होती. यामध्ये तिला 705 गुण मिळाले. आणि विशेष म्हणजे ही मुलगी बारावी परीक्षेत नापास झाली असून मुलीला नीट मध्ये 705 गुण कसे मिळाले. असा याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात प्रश्न उपस्थित केला आहे. या संदर्भात आढावा घेताना संबंधित परीक्षा केंद्राचा सक्सेस दर काय आहे असा प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारला असता, त्याचे उत्तर केवळ सहा टक्के असे आले आहे. यामुळे त्या परीक्षा केंद्रात परीक्षा दिलेल्या एकूण परीक्षार्थी पैकी फक्त सहा टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये त्या मुलीचा समावेश आहे .आता यापुढील न्यायालयीन चौकशीत जे काही निष्पन्न होणार आहे त्याकडे संपूर्ण कर्नाटकाचे आणि बेळगाव जिल्ह्याचेही लक्ष लागले आहे. संबंधित परीक्षा केंद्र नेमके कुठे होते आणि तेथे कोणते गैरप्रकार झाले याची चौकशी आता न्यायालयीन आदेशानुसार होणार आहे. न्यायालयीन कामकाजा संदर्भात बातमी देणाऱ्या लाईव्ह लॉ या वेबसाईटनेही या संदर्भात भाष्य केले असून यामुळे बेळगाव येथील परीक्षा केंद्राची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.


Mumbai Central Railway:मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने, वाहतूक पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न

Mumbai Central Railway:मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने, वाहतूक पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू ओव्हरहेड वायरवर पडलेला बांबू हटवण्यात यश वाहतूक विस्कळीत झाल्याने ट्रॅकवर चालत धोकादायक प्रवास .. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी


Vishalgad Encroachment : विशाळगडावर शिवप्रेमींच्या नावाखाली हिंसाचार

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा विशाळगडावर शिवप्रेमींच्या नावाखाली काही गुंडांनी हिंसाचार केला. या घटनेचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. सरकारने पावसाळा संपल्यानंतर अतिक्रमणे काढायला हवी होती. येथे हिंसाचार करणार्‍यांच्या पाठीशी जो कोणी असेल, त्याच्यावर तातडीने गुन्हे दाखल व्हायला हवेत, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष आमदा...


उपाध्यक्षपदाचा दावेदार

जेम्स डेव्हिड बाऊमन हे त्यांचे मूळ नाव. अमली पदार्थांच्या आहारी गेलेली आई आणि कुटुंबाला वाऱ्यावर सोडून गेलेले वडील अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले जेम्स यांना आजी-आजोबांनी वाढवले.


Plane Crash : विमान कोसळण्याआधीचा 'तो' VIDEO आला समोर

काठमांडू : प्रवाशांनी भरलेलं विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांना घेऊन जाणारं विमान अचानक कोसळलं आणि परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक लोक आणि आपत्कालीन विभाग घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार क्रू मेंबर्ससह 19 प्रवासी या विमानाने प्रवास करत होते.नेपाळच्या काठमांडू परिसरात विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला आहे. विमान कोसळल्यानंतर आग लागली आणि...


लहुसिंग अतिग्रे यांचे निधन

कोल्हापूर : पॅको इंडस्ट्रीजचे सदस्य व युनायटेड इंडस्ट्रीजचे संस्थापक प्रसिद्ध उद्योगपती लहुसिंग भाऊसो अतिग्रे यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने ताराबाई पार्क येथील निवासस्थानी निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. पॅको इंडस्ट्रीजच्या उभारणीत अतिग्रे यांचा मोलाचा वाटा होता. उद्योग क्षेत्राबरोबरच प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष, कोल्हापूर जनता...


Kolhapur Rain : कुरुंदवाडमधील गोठणपूर परिसरात पुराचे पाणी

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा पावसाने गेल्या चार दिवसांपासून सातत्य ठेवल्याने पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. कृष्णा नदीची इशारा पातळीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. पंचगंगा नदीचे कुरुंदवाड गोठणपूर परिसरात पाणी आल्याने कोरवी गल्लीतील 5 ते 6 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. काही जनावरांच्या गोठ्यात ही पाणी आल्याने जनावरांचे स्थलांतर करण्यात आ...


देशी बीज बँक!

पद्माश्री पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपेरे यांनी देशी बियाणांचा संग्रह केला आहे.


SBI SCO Recruitment 2024: एसबीआय SCO भरती ! कसा कराल अर्ज, कशी होणार निवड; जाणून घ्या सविस्तर

SBI SCO Recruitment 2024: इच्छुक व पात्र उमेदवार या भरतीसाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. पण, एक उमेदवार फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतो...


Nashik News | घोरवड शिवारात होणार मुक्त विद्यापीठ विस्तारित केंद्र

सिन्नर : नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विस्तारित केंद्र सिन्नर तालुक्यातील घोरवड येथे उभारण्याच्या हालचालीना वेग आला आहे. विस्तारित केंद्रासाठी आवश्यक जवळपास १०० एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबत घोरवड ग्रामपंचायतीचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. तथापि, ग्रामस्थांनी काही अटी-शर्ती घालून ही जागा उपलब्ध करून दिली असल...


Budget 2024 : गृहनिर्माणासाठी २.२ लाख कोटींचे अर्थसहाय्य

परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित व्याज अनुदानाची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली.


Zika Virus : केंद्राची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, राज्यात झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ

Zika Virus : महाराष्ट्रात झिका वायरस, गुजरातमध्ये चांदीपुरा आणि केरळात निपाह वायरस यांच्या रुग्णात झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे केंद्र सरकारने तातडीचे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.


Jagannath Temple Ratna Bhandar: रत्न भांडारात सापडली प्राचीन काळातील खास वस्तू, पाहून सारेच थक्क, राजांसोबत थेट संबंध

Puri Jagannath Temple Ratna Bhandar Treasure: पुरी येथील जगन्नाथ मंदिरात्या रत्न भांडारात मोठ्या प्रमाणात सोनं, चांदी, रत्न, हिरे पुन्हा एकदा बाहेर काढण्यात आले आहेत. यांची यादी तयार केल्यानंतर ते पुन्हा रत्न भांडारात ठेवले जातील, तोपर्यंत ते तात्पुरत्या तिजोरीत ठेवण्यात आले आहेत.


Joe Biden : जो बायडेन जिवंत असल्याचे पुरावे द्या! अमेरिकेत नेमकं काय चाललंय? धक्कादायक मागणीने खळबळ

Joe Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन गेल्या पाच दिवसांपासून दिसत नसल्याने भलतीच चर्चा रंगली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत बऱ्याच दिवसांपासून कोणतेही अपडेट जारी करण्यात आले नव्हते. बायडेन यांनी सोशल मीडियावर एक संदेश जारी करत पुढील निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. बायडेन कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बायडेन यांच्या घोषणेपासून त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अटकळ सुरू झाली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, केवळ रिपब्लिकनच नाही तर...


Vasai Crime News : बनावट औषधे बनवणाऱ्या कंपनीचा गोरखधंदा उघड; तब्बल 1 करोड 41 लाखांच्या औषधांसह मुद्देमाल जप्त

Vasai Crime News वसई : महाराष्ट्र सरकारच्या अन्न औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. यात बनावट औषधे बनवणाऱ्या कंपनीचा गोरखधंदा उघड करण्यात अन्न औषध प्रशासनाला (Food and Drug Administration) मोठे यश आले आहे. या कारवाईत तब्बल 1 करोड 41 लाखांच्या बनावट औषधांसह मोठ्या प्रमाणात इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 10 जुलै रोजी वसईच्या (Vasai Crime) गहरवार फार्मा प्रोडक्टस प्रा.लि. कंपनीवर धाड टाकून 1 करोड 41 लाखांची औषधे आणि त्याला लागणा-या...


Earthquake : कोयनानगर येथे भूकंपाचा धक्‍का

चिपळूण ; पुढारी वृत्‍तसेवा कोयनानगर पोफळी परिसरात आज (बुधवार) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. २.८ रिक्टर स्केलचा हा भूकंप होता. दुपारी ३ वाजून २६ मिनीटांनी हा भुकंपाचा धक्‍का जाणवला. त्याचा केंद्रबिंदू हेळगाव गावच्या पश्चिमेला १० कि.मी आणि १५ कि.मी खोल होता. (Earthquake) IAS Puja Khedkar | पूजा खेडकर यांचा आणखी एक का...


Pooja Khedkar Special Report: पूजा खेडकरांसारखे आणखी किती अधिकारी?

Pooja Khedkar Special Report: पूजा खेडकरांसारखे आणखी किती अधिकारी? वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्या विरोधात तक्रार दिली होती पुणे पोलिसांनी २ वेळा नोटीस देऊन सुद्धा पूजा खेडकर उपस्थितीत राहिल्या नाहीत पुणे पोलिसांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही दिल्लीत गुन्हा दाखल झाल्याने अटकेच्या भीतीनं पूजा खेडकर नॉट रिचेबल असल्याची चर्चा


वेण्णा पुलावरून कार नदीत कोसळली

केळघर : महाबळेश्वर - सातारा रोडवर आंबेघर तर्फ मेढा येथील रामजी बुवा मंदिराशेजारील वेण्णा नदीच्या पुलावरुन कार सुमारे चाळीस फूट खोल नदीत कोसळली. कारमधील चार जण जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी रात्री १० वा. सुमारास घडली. दरम्यान, या अपघाताबाबत पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. पुलावरून कार थेट नदीत कोसळली, कोल्हापूर जिल्ह्यातील भीषण दुर्घटना कण्...


75 Years Of NATO : ‘नाटो’च्या असण्याचा अर्थ

75 Years Of NATO: जगात दोन सशस्त्र संघर्ष चालू असतानाच दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या ‘नाटो’ या लष्करी राष्ट्रसमूहाला अलीकडेच ७५ वर्षे पूर्ण झाली. या संघटनेचे महत्त्व आणि भविष्य यांचा घेतलेला हा वेध...


धर्मादाय रुग्णालयांत गरिबांवर मोफत, सवलतीत उपचार

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख ८० हजार रुपये आहे, त्यांना मोफत उपचार. अन्य गरीब रुग्णांना ५० टक्के सवलतीच्या दराने उपचार.


NITI Aayog Restructuring : मित्रपक्षांचे वजन वाढलं, NITI आयोगाची पुनर्रचना, इतक्या मंत्र्यांचा समावेश

NITI Aayog Restructuring : केंद्र सरकारने नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत मित्रपक्षांच्या सदस्यांना महत्व देण्यात आले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून देण्यात मित्र पक्षांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भाजप आपल्या मित्रपक्षांची विशेष काळजी घेत आहे.


दास्य भक्ती

दास्य भक्तीमध्ये दास्य हा भाव आहे. कोणतेही कर्म करीत असताना आपण भगवंताचे दास आहोत, असा अखंड भाव अपेक्षित आहे.


Lokmanya Tilak Statue : एका पुतळ्याचं मनोगत, माझी हक्काची जागा मला कधी मिळणार?

Lokmanya Tilak : डोंबिवलीतला सुशोभीकरणासाठी हटवण्यात आलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा अद्यापही उभारण्यात आलेला नाही, त्यानिमित्ताने हा विशेष लेख


बळीराजाच्या उन्नतीसाठी जेएनपीएचा पुढाकार

उरण : राजकुमार भगत जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरण (जेएनपीए) कृषी मालावर आधारीत प्रक्रिया आणि साठवणूक केंद्र उभारणार असून केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जेएनपीएच्या प्रस्तावाला नुकतीच 19 जुलै 2024 रोजी मान्यता दिली. या प्रकल्पासाठी 285 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. अशा प्रकारची देशातील बंदरांमध्ये जेएनपीएने...


TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 24 July 2024 : ABP Majha

TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 24 July 2024 : ABP Majha नाशिकमध्ये पावसाची संततधार, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाणी पातळीत वाढ, नाशिककरांवरील पाणी कपातीचे संकट टळलं. चार दिवसांपासून गडचिरोलीत अतिवृष्टी, अनेक नद्यांना पूर, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांकडून पूरपरिस्थितीची हेलिकॉप्टरमधून पाहणी. अहमदनगर जिल्ह्याच्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ, भंडारदरा धरण ५६ टक्के, मुळाधरण ३७ टक्के तर निळवंडे धरणाचा साठा २५ टक्क्यांवर. दोन दिवसांपासून गोसीखूर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस, धरणाचे ३३ दरवाजे उघडले, ३ लाख ५० हजार ५२४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग. गोंदियात पावसाच्या जोर कायम, इटियाडोह धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्या धरणात ९८.१७ टक्के जलसाठा असून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता शहापूरमध्ये धरण क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी, मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण ९७ टक्के भरलं. माळशेज परिसरात मुसळधार पावसामुळे धबधबे मोठ्य़ा प्रमाणात प्रवाहित, धबधब्याचं पाणी महामार्गावर आल्याने वाहतुकीवर काहिसा परिणाम, धबधब्यावर पर्यटकांची गर्दी.


Sharad Pawar on Sunetra Pawar बारामतीत सुनेत्रा पवारांना मतं का मिळाली नाहीत? पवारांनी गणित सांगितलं

Sharad Pawar on Sunetra Pawar बारामतीत सुनेत्रा पवारांना मतं का मिळाली नाहीत? पवारांनी गणित सांगितलं ही बातमी पण वाचा Sunetra Pawar at Modibaug: सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या? शरद पवारांना भेटल्या का? अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण मुंबई: छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अशातच मंगळवारी अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार पुण्यातील मोदीबागेत (Modibaug) पोहोचल्याने राजकीय वर्तुळाला दुसरा धक्का बसतो की काय, असे वाटत होते. त्या अचानक शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला का पोहोचल्या, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या मोदी बागेत शरद पवार यांच्या भेटीला गेले नसल्याचे समोर आले आहे. याबाबत अजित पवार यांच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले आहे. सुनेत्रा पवार नीता पाटील यांना भेटायला गेल्या होत्या . अजित पवारांची (Ajit Pawar) बहीण नीता पाटील मोदीबागेत बी विंग मध्ये पाचव्या मजल्यावर राहतात . त्यांना भेटण्यासाठी सुनेत्रा पवार गेल्या होत्या, असे सुरज चव्हाण यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांची खासदारपदी बिनविरोध निवड झाली होती. या सर्व घटनाक्रमानंतर सुनेत्रा पवार आज खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यातील शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या मोदीबागेत दाखल झाल्या होत्या. सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये दाखल झाल्या तेव्हा शरद पवार, सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.


Accident Death| मोटारीच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू

पुणे: भरधाव मोटारीच्या धडकेत शनिवारी सकाळी शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कल्याणीनगर भागात घडली. अपघाताच्या घटनेनंतर कल्याणीनगर भागातील नागरिक संतप्त झाले असून, सुसाट वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी रहिवाशांनी केली आहे. सातार्‍यात एकाला सव्वादोन कोटींचा चुना शाश्वत राम बोगाडे (वय १५, रा. कुमार कृती सोसायटी, कल्याणीनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या ...