7th pay commission : केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक महागाई भत्याच्या (डीए) प्रतिक्षेत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात ४ टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. ही वाढ जानेवारी २०२३ ते जून २०२३ पर्यंत पहिल्या सहा महिन्यांसाठी असणार आहे.पुढील आठवड्यात सरकार यासंदर्भात निर्णय घेऊ शकते.
पुढील आठवड्यात सरकार यावर निर्णय घेऊ शकेल. सरकार डीएमध्ये ४ टक्के वाढ करण्याची अपेक्षा आहे. डीए आणि डीआरमध्ये ही वाढ जानेवारी २०२३ ते जून २०२३ पर्यंत म्हणजे पहिल्या सहा महिन्यांसाठी असणार आहे. ही दरवाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात किती टक्के वाढ होईल ते पाहूया.
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ
किती टक्के वाढ होईल
४ टक्के डीएमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. केंद्र सरकारच्या एका कर्मचाऱ्याचा बेसिक पगार २५५०० रुपये प्रति महिना असेल. तर ३८ ट्कके डीए ९६९० रुपये ही रक्कम जमा होते. जर डीए ४टक्के वाढला तर आता डीए ४२ टक्के होईल. रक्कमेच्या हिशोबानुसार १०७१० रुपये होतात. त्यामुळे १०७१०-९६९० = १०२० रुपयांची वाढ होणार आहे.
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका, DA बाबत सरकारकडून निराशा
महागाईच्या काळात वाढ
याचप्रमाणे सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही वाढीव महागाई भत्त्याचा फायदा होणार आहे. सर्वच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डीएची रक्कम समान आहे. महागाईच्या काळातही ४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. डीए वाढल्याने निवृत्तीवेतनधारकांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. मासिक पेन्शनची मर्यादा सध्या ३८ टक्के आहे. वाढीव ४ टक्के व्याजानंतर ती ४२ टक्के होईल.
2023-03-19T04:21:00Z dg43tfdfdgfd