५२८ किमी सलग धावणारी एकमेव भारतीय ट्रेन कोणती? महाराष्ट्रात ‘या’ स्थानकातुन जर ट्रेन चुकली तर थेट…

Indian Railway Interesting Facts: भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगभरात चर्चेचा विषय ठरते. भारतासारख्या मोठ्या क्षेत्रफळाच्या देशात, विविध सण- उत्सवांची दखल घेऊन स्पेशल गाड्या सोडणारी व प्रवाशांच्या वेळ- पैशाची बचत करणारी भारतीय रेल्वे ही एकमेव प्रणाली म्हणता येईल. अनेकदा ट्रेनने प्रवास करताना लोकांची एकच तक्रार असते की वेळ खूप जातो. याचे कारण म्हणजे भारतात दर काही किलोमीटरवर एक रेल्वे स्टेशन आहेच त्यामुळे इतक्या ठिकाणी थांबत रेल्वे प्रवासाचा वेळ वाढणार हे साहजिक आहे. पण तुम्हाला माहित आहे का भारतात अशीही एक ट्रेन आहे जी तब्ब्ल ५२८ किलोमीटर पर्यंत न थांबता धावते. आज आपण याच ट्रेनचा भन्नाट प्रवास जाणून घेणार आहोत.

भारतीय रेल्वेची ट्रेन निजामुद्दीन-त्रिवेंद्रम (केरल) राजधानी एक्सप्रेस ही राजस्थानच्या कोटा येथून गुजरातच्या वडोदरापर्यंत एकही थांबा न घेता प्रवास करते. ही देशातील सर्वात नॉन- स्टॉप धावणारी पहिली ट्रेन आहे. तब्ब्ल ५२८ किलोमीटरचा प्रवास ही ट्रेन फक्त ६ तास ३० मिनिटात पूर्ण करते. वेगाच्या बाबत ट्रेन शताब्दी एक्सप्रेसला सुद्धा मागे टाकते. मीडिया रिपोर्टनुसार. या ट्रेनचा एकूण प्रवास तब्ब्ल २८४५ किलोमीटरचा आहे त्यातील ५२८ किमी ट्रेन सलग धावते.

१९९३ च्या जुलै महिन्यात या ट्रेनची सुरुवात झाली होती. तेव्हा ११ डब्ब्यांची ही ट्रेन असायची व आता २०२३ मध्ये संख्या वाढवून डब्ब्यांची संख्या २१ करण्यात आली आहे. या ट्रेनचा प्रवास दिल्लीतून सुरु होतो व दर रविवार, मंगळवार व बुधवारी ट्रेन सोडली जाते. परतीच्या प्रवासासाठी ट्रेन केरळमधून मंगळवार, गुरुवार व शुक्रवारी सोडली जाते.

हे ही वाचा<< ट्रेन ‘या’ शब्दाचा फुल फॉर्म माहितेय का? तुमच्या रेल्वे तिकिटावरील ‘या’ अक्षरांचे खरे अर्थ जाणून घ्या

महाराष्ट्रात ‘या’ ४ ठिकाणी थांबते ट्रेन (Trivandrum Rajdhani Express Maharashtra Stops)

दिल्ली ते केरळ हे अंतर पाहता या ट्रेनचे स्टॉप मुद्दामच कमी ठेवण्यात आले आहे. दिल्लीतुन निघणाऱ्या या ट्रेनने हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व केरळ असा भलामोठा प्रवास केला जातो. महाराष्ट्रात ही ट्रेन केवळ वसई,पनवेल, रत्नागिरी, सावंतवाडी येथे थांबते.

2023-03-19T05:24:27Z dg43tfdfdgfd