बातम्या

Trending:


अर्थसंकल्पात महाराष्ट्र आहे कुठे ?

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला झुकते माप दिले जाईल, अशी अटकळ बांधली जात होती.


Union Budget 2024 : नव्या कररचनेमध्ये मोठे बदल; 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के आयकर

Union Budget 2024 : नव्या कररचनेमध्ये मोठे बदल; 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के आयकर नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी संसदेत एनडीए सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी सामान्य नोकरदारांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या नव्या Income Tax Slab विषयी घोषणा केली. जुन्या करणप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, नव्या करप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली. नव्या करणप्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदरांचे 17500 रुपये वाचणार आहेत. याशिवाय, नव्या करप्रणालीत स्टँटर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजारावरुन 75 हजारापर्यंत वाढवण्यात येणार आहे. तर फॅमिली पेन्शन डिडक्शनची मर्यादा 15 हजारावरुन 25 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. नव्या करप्रणालीनुसार कोणत्या उत किती रक्कम भरावी लागणार? 3 लाख रुपये- कोणताही कर नाही 3 लाख ते 7 लाख रुपये- 5 टक्के 7 लाख ते 10 लाख रुपये- 10 टक्के 10 लाख ते 12 लाख- 15 टक्के 12 लाख ते 15 लाख - 20 टक्के 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न- 30 टक्के एकीकडे, सरकारने नवीन कर प्रणालीमध्ये स्टँटर्ड डिडक्शनची मर्यादा बदलली तर कर स्लॅब देखील पूर्वीपेक्षा सोपे केले आहेत. दुसरीकडे, जुन्या कर प्रणालीमध्ये सरकारला सूट वाढवणे अपेक्षित होते, परंतु सरकारने त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केलेले नाहीत. आता करप्रणालीतील हे बदल करदात्यांच्या पचनी पडणार का, हे पाहावे लागेल. नव्या करप्रणालीत झालेले बदल नोकरदारांसाठी फायदेशीर ठरणार, असे तुर्तास तरी दिसत आहे.


Cave On Moon: चंद्रावरील संशोधनाचे द्वार

Cave On Moon: ही गुहा म्हणजे लाव्हाच्या नलिका म्हणजे नैसर्गिक बोगदे. लाव्हाचे प्रवाह या पृष्ठभागाखाली असतात. या गुहा मागील ५० वर्षे गूढ होत्या. परंतु, आता ‘नासा’च्या लुनार रीकॉनेसन्स ऑर्बिटरने दिलेल्या डेटाने हे सिद्ध केले आहे.


Guru Purnima : गुरुः साक्षात् परं ब्रह्म...

Guru Purnima : ज्या दिवशी गुरूपासून दीक्षाग्रहण होईल, त्या दिवशी साधकाला पुनर्जन्म प्राप्त होतो, असे शांतिब्रह्म एकनाथ महाराज भागवतातील १३व्या अध्यायात प्रतिपादन करतात. गुरुपासोनि दीक्षा ग्रहण। ते पुरुषासी नवे जन्म जाण॥


Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनहून मुंबईत दाखल

Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनहून मुंबईत दाखल लंडनहून छत्रपती वाघनखं महाराष्ट्रात दाखल, लंडनच्या व्हिक्टोरिया संग्रहालयातील वाघनखे सकाळी झाली मुंबईत दाखल.


Narayan Survey Special Report : नारायण सुर्वेंचा फोटो पाहताच चोराचा माफीनामा

Narayan Survey Special Report : नारायण सुर्वेंचा फोटो पाहताच चोराचा माफीनामा आणि आता बातमी आहे सुप्रसिद्ध कवी आणि पद्मश्री नारायण सुर्वेंच्या घरातील चोरीची...नारायण सुर्वेंच्या नेरळ येथील घरात चोरी झाली.. आपण ज्या घरात चोरी करतोय ते घर कवी नारायण सुर्वेंचं असल्याचं समजताच चोराला पश्चाताप झाला. चोरी केलेल्या सर्व वस्तू परत करण्याची कबुली या चोराने दिली. तसं पत्र त्याने लिहिलंय. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली या ओळी नारायण सुर्वेंच्या कवितेच्या आहेत.. भाकरीचा चंद्र शोधण्याचा मार्ग चुकीचा असल्याची उपरती चोराला झाली आणि त्याने आपला गुन्हा कबुल करुन सर्व ऐवज परत करण्याची हमी दिली.. आज एका प्रामणिक चोरट्याचं महाराष्ट्राला दर्शन झालंय... आता तुम्ही म्हणाल चोरटा आणि प्रामाणिक कसा काय? तर त्याचं झालंय असं की एका चोरट्यानं एका मोठ्या कवीच्या घरावर डल्ला मारला.... आणि आपण कुणाच्या घरावर डल्ला मारलाय हे कळताच त्यानं चोरलेला सगळा मुद्देमाल जसाच्या तसा परत आणून दिला... कोण आहेत ते कवी आणि चोरट्यानं नेमकं काय केलं... पाहुयात ह्या रिपोर्टमधून...


Jagannath Temple Ratna Bhandar: रत्न भांडारात सापडली प्राचीन काळातील खास वस्तू, पाहून सारेच थक्क, राजांसोबत थेट संबंध

Puri Jagannath Temple Ratna Bhandar Treasure: पुरी येथील जगन्नाथ मंदिरात्या रत्न भांडारात मोठ्या प्रमाणात सोनं, चांदी, रत्न, हिरे पुन्हा एकदा बाहेर काढण्यात आले आहेत. यांची यादी तयार केल्यानंतर ते पुन्हा रत्न भांडारात ठेवले जातील, तोपर्यंत ते तात्पुरत्या तिजोरीत ठेवण्यात आले आहेत.


MPSC मंत्र : भूगोल घटक –गट ब अराजपत्रित सेवा मूख्य परीक्षा

गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षेच्या पेपर दोनमधील भूगोल घटकाची तयारी कशी करावी ते या लेखामध्ये पाहू.


RTE Admission 2024 : ‘आरटीई’ कागदपत्रांची मंगळवारपासून पडताळणी; पालकांना पाठवले जाणार मेसेज

Check RTE Admission Status: राज्यात 9 हजार 196 शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत 1 लाख 4 हजार 687 जागा उपलब्ध आहेत. यासाठी तीन लाखांहून अधिक पालकांनी अर्ज केले होते. प्राप्त झालेलेल्या अर्जाच्या 25 टक्केच जागा शिल्लक असल्याने शिक्षण मंडळाकडून लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.


High tide alert|आज समुद्राला मोठी भरती

मुंबई : अरबी समुद्राला रविवारी दुपारी १२.१० वाजता मोठी भरती येणार असून समुद्रात ४.४४ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने चौपाटी व समुद्रकिनाऱ्यावर विशेषत: मरीन ड्राईव्हवर फिरायला येणाऱ्या नागरिकांना सावधतेचा इशारा दिला आहे. अरबी समुद्र का तापतोय? मुंबई सुरू असलेला पाऊस व रविवारी समुद्राला असलेली भरती यामुळे मुंबई महापालिकेचे ...


Sharad Pawar on Sunetra Pawar बारामतीत सुनेत्रा पवारांना मतं का मिळाली नाहीत? पवारांनी गणित सांगितलं

Sharad Pawar on Sunetra Pawar बारामतीत सुनेत्रा पवारांना मतं का मिळाली नाहीत? पवारांनी गणित सांगितलं ही बातमी पण वाचा Sunetra Pawar at Modibaug: सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या? शरद पवारांना भेटल्या का? अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण मुंबई: छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अशातच मंगळवारी अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार पुण्यातील मोदीबागेत (Modibaug) पोहोचल्याने राजकीय वर्तुळाला दुसरा धक्का बसतो की काय, असे वाटत होते. त्या अचानक शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला का पोहोचल्या, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या मोदी बागेत शरद पवार यांच्या भेटीला गेले नसल्याचे समोर आले आहे. याबाबत अजित पवार यांच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले आहे. सुनेत्रा पवार नीता पाटील यांना भेटायला गेल्या होत्या . अजित पवारांची (Ajit Pawar) बहीण नीता पाटील मोदीबागेत बी विंग मध्ये पाचव्या मजल्यावर राहतात . त्यांना भेटण्यासाठी सुनेत्रा पवार गेल्या होत्या, असे सुरज चव्हाण यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांची खासदारपदी बिनविरोध निवड झाली होती. या सर्व घटनाक्रमानंतर सुनेत्रा पवार आज खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यातील शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या मोदीबागेत दाखल झाल्या होत्या. सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये दाखल झाल्या तेव्हा शरद पवार, सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.


Rainfall Updates | राज्यात पावसाची रिपरिप सुरूच राहणार, अधूनमधून जोरदार

पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान राज्यातील बहुतांशी भागांत धुवाँधार पाऊस सुरूच आहे. दरम्यान पुढील २ ते ३ दिवस राज्यातील कोकण परिसरात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. या संदर्भातील पोस्ट डॉ.के. एस. होसाळीकर यांनी एक्स अकाऊंटवरून शेअर केली आहे. राज्यात अधूनमधून ज...


ABP Majha Headlines 8PM एबीपी माझा हेडलाईन्स 8PM 23 July 2024 Marathi News

कस्टम ड्यूटी कमी केल्यानं सोन्याच्या दरात मोठी घट, मुंबईसह अनेक शहरांत सोनं ५ हजारांनी स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण... मोबाईल फोन, चार्जर, इलेक्ट्रिक वाहनं, कॅन्सरची औषधं, सोलर पॅनल स्वस्त होणार, आयात शुल्क कमी करण्यासह बजेटमधील इतर तरतुदींचा सकारात्मक परिणाम नवीन कररचनेत ३ ते ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के टॅक्स, करात १७ हजार ५००च्या घरात फायदा, तर स्टँडर्ड डिडक्शन 50 हजारांवरून 75 हजारांवर, पहिल्या नोकरीसाठी पीएफ खाते सुरू करणाऱ्यांना तीन हप्त्यांत १५ हजार रुपये, अर्थसंकल्पात निर्मला सीतारामण यांची घोषणा, १ लाख पगारपर्यंतची मर्यादा महाराष्ट्र सरकारच्या धर्तीवर केंद्राचीही लाडका भाऊ योजना...५०० टॉप कंपन्यांमध्ये १ कोटी तरुणांना १२ महिन्यांची इंटर्नशीप...महिन्याला ५ हजार रुपये भत्ता... एनडीए सरकारला पाठिंबा देणाऱ्या चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांना रिटर्न गिफ्ट, आंध्रच्या अमरावती राजधानीसाठी १५ हजार कोटी, बिहारला रस्त्यांसाठी २६ हजार कोटी


Gas Leak: रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत वायू गळती; 50 लोकांना बाधा?

खेड, रत्नागिरी:रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या लोटे एमआयडीसीमधील एका केमिकल कंपनीमधून वायू गळती झाली आहे. त्या परिसरात असणाऱ्या तलारेवाडी येथील 40 ते 50 ग्रामस्थांना वायू बाधा झाली आहे. त्यात लहान मुलं आणि महिलांचा देखील समावेश आहे. रूग्णांना रूग्णवाहिकेच्या माध्यमातून दवाखान्यात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर महिना भरातील ही दुसरी घटना असल्याने एमआयडीसीमधील एक्सल कंपनीसमोर ग्रामस्थानी गर्दी...


Maharashtra| विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंची रणनीती

Uddhav Thackeray Hold Meeting On Preparation Of Vidhan Sabha Election


BSNL, Achhe Din | राज्यात पंधरा दिवसांत सव्वा लाख नवे ग्राहक

राज्यात पंधरा दिवसांत 'बीएसएनएल' चे सव्वा लाख नवे ग्राहक


...म्हणून जरांंगेंनी उपोषण सोडलं, लक्ष्मण हाकेंनी सांगितलं ते कारण

सुरेश जाधव, प्रतिनिधीबीड:राज्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी विरूद्ध मराठा असा टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो आहे. मनोज जरांगेंनी आपल्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केलं आहे. त्याचा पाचवा दिवस आहे. तर दुसरीकडे पुणे न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही काढले आहे.तर ओबीसी आरक्षण बचावचे नेते लक्ष्मण हाकेंनी देखील ओबीसी जनआक्रोश यात्रा काढली आहे. हाकेंच्या यात्रेला देखील ओबीसी समाजाचा चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. आता...


अमर रुग्णालयाची वैद्यकीय सेवा संशयाच्या भोवऱ्यात

पूणे येथील तिहेरी हत्याकांडामधील पिडीतेचा कळंबोली येथील अमर रुग्णालयामध्ये ८ जुलैला मृत्यू झाल्याने अमर रुग्णालयाची वैद्यकीय सेवेतील निष्काळजीपणा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.


NITI Aayog Restructuring : मित्रपक्षांचे वजन वाढलं, NITI आयोगाची पुनर्रचना, इतक्या मंत्र्यांचा समावेश

NITI Aayog Restructuring : केंद्र सरकारने नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत मित्रपक्षांच्या सदस्यांना महत्व देण्यात आले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून देण्यात मित्र पक्षांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भाजप आपल्या मित्रपक्षांची विशेष काळजी घेत आहे.


Shambhuraj Desai : मी गोपनीयतेची शपथ घेतलीय, काही बोलणार नाही; अजित पवार-गिरीश महाजनांच्या वादावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया

मुंबई: मी मंत्रिपद स्वीकारताना गोपनीयतेची शपथ घेतली होती, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झालं हे सांगणार नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधीच्या मागणीवरून अजित पवार (Ajit Pawar) आणि गिरीश महाजनांचा वाद झाल्याची माहिती आहे. त्यावर बोलताना शंभुराज देसाईंनी ही सावध प्रतिक्रिया दिली. आपल्या खात्याला अधिकचा निधी द्यावा अशी मागणी गिरीश महाजनांनी अजित पवारांकडे केली...


US President Joe Biden withdraws from US presidential election race: जो बायडेन यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार

US presidential election: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाजूला होत असल्याचं स्पष्ट केलं आहे.


Nashik Industry News | जांभळाने उंचावले आदिवासींचे 'अर्थ'कारण

नाशिक : सतीश डोंगरे जंगलात मिळणारे वनउपज आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. जांभूळ त्यातीलच एक घटक असून, आदिवासींचे अर्थकारण उंचावण्यात फायदेशीर ठरत आहे. नाशिक जिल्ह्यासह गडचिरोलीमधील आदिवासी जांभूळ उत्पादनातून आर्थिक स्थैर्य मिळविण्यात यशस्वी ठरत असून कोकण, अहमदनगर या जिल्ह्यातील जांभूळ उत्पादक शेतकरी लाखो रुपयांचे पीक घेत आहेत. बहुगुणी फळ...


Thane Municipality News | ठाणे महापालिकेचे नऊ कोटी रुपये पाण्यात

ठाणे : प्रवीण सोनावणे सार्वजनिक ठिकाणी वावरतांना महिलांच्या सुविधेसाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात अर्बन रेस्टरूम बांधण्यात आले. या अर्बन रेस्टरूममध्ये स्तनपान, शौचालय, कपडे बदलण्यासाठी जागा अशा अनेक सुविधा देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात ही अर्बन रेस्टरूम सुरूच झाली नाहीत. या रेस्टरूमचे काय झाले याची माहिती देखील पाल...


Lote MIDC Explosion| लोटे एमआयडीसीतील स्फोट; एक कामगार जखमी

लोटे: खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहती मधील श्री पुष्कर केमिकल च्या एक नंबर प्लांटमध्ये आज सकाळी अकरा वाजता स्फोट झाला. येथील ऑक्साईड च्या स्टोरेज टॅंक मध्ये स्फोट झाल्याने संपूर्ण औद्योगिक वसाहत हादरली. Agricultural Insurance| पीक विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ स्फोटामध्ये एक कामगार जखमी झाला असून एमआयडीसीच्या अग्निशामन दलाने एक तासात आग आ...


Mumbai Rains Train Updates : मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वे 10 मिनिटं उशीराने वाहतूक

Mumbai Rains Train Updates : मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वे 10 मिनिटं उशीराने वाहतूक मुसळधार पावसाचा मुंबईच्या लोकल सेवेवर परिणाम तीनही मार्गांवरची लोकल वाहतूक पावसामुळे विस्कळीत मुसळधार पावसामुळे दृश्यमानता घटली, लोकल वाहतूक विलंबाने


मुरगूडचा सरपिराजीराव तलाव ओसंडून वाहू लागला

मुरगूड : संस्थान काळातील ऐतिहासिक असा मुरगूडचा सरपिराजीराव तलाव मंगळवारी पहाटे पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला. याबद्दल नागरिकांतून समाधान व आनंद व्यक्त होत आहे. मुरगूड शहरासह शिंदेवाडी व यमगे या गावांना पिण्याचा पाणीपुरवठा ज्या तलावातून होतो तो ऐतिहासिक सरपिराजीराव तलाव मंगळवारी (दि. २३) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ओव्हर फ्लो झाला. तलावाच्...


Lokmanya Tilak Statue : एका पुतळ्याचं मनोगत, माझी हक्काची जागा मला कधी मिळणार?

Lokmanya Tilak : डोंबिवलीतला सुशोभीकरणासाठी हटवण्यात आलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा अद्यापही उभारण्यात आलेला नाही, त्यानिमित्ताने हा विशेष लेख


Flamingo Park: भांडुप येथे फ्लेमिंगो पार्क उभारणार; पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

Flamingo Park Bhandup: भांडुप येथे फ्लेंमिंगो पार्क विकासित केले जाणार असून सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले


Thane Rain Alert | आजपासून सलग सहा दिवस ठाण्याच्या खाडीला भरती

ठाणे : आज सोमवार (दि.२२) रोजी पासून पुढचे सलग सहा दिवस ठाण्याच्या खाडीला भरती येणार असून, यावेळी 4 मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने खाडी किनारी राहणार्‍या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून ठाण्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पुढचे काही दिवस ठाणे जिल्ह्यात म...