विजयाचा आनंद ठरला औटघटकेचा

बेळगाव : कुणाचा मृत्यू कधी व कसा होईल, हे सांगता येत नाही. रविवारी (दि. 2) झालेल्या बेळगाव तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी संघ निवडणुकीत संचालक म्हणून विजयी झालेल्या शिक्षकाचा मंगळवारी (दि. 4) सायंकाळी सहाच्या सुमारास हृदयाघाताने मृत्यू झाला.

विवेक उर्फ राजू गुंडू सुतार (रा. कलमेश्वर गल्ली येळ्ळूर) असे त्यांचे नाव आहे. त्यामुळे, विजयाचा आनंद औटघटकेचा ठरला. त्यांच्या पश्चात, चार बहिणी, एक भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे. गुरुवारी (दि. 6) सकाळी 8 वाजता रक्षाविसर्जन होणार आहे. विवेक यांनी सहकार व सामाजिक क्षेत्रामध्ये स्वत: ला वाहून घेतले होते. येळ्ळूरच्या स्वामी विवेकानंद सोसायटीचे संचालक म्हणूनही ते कार्यरत होतेे. याचबरोबर आता बेळगाव तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी संघावरही ते विजयी झाले होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

2025-02-05T00:36:23Z