पिंपरी : जनावरे पळवणार्‍या टोळीवर मोका

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि रायगड परिसरातून जनावरे पळवणार्‍या टोळीवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली. मोशीन बाबू कुरेशी, शाहिद रहेमान कुरेशी, मोहम्मद अब्दुल रहमान कुरेशी, आशराफ सलमान कुरेशी, मोहम्मद आरिफ सलमान कुरेशी, सोहेल फारूक कुरेशी, राहुल पंडित ऊर्फ राहुल भैया ऊर्फ राहील महम्मद कुरेशी, मोशीन शरीफ कुरेशी, जाफर सुजितकुमार सुभाषचंद्र पाणीग्रही अशी मोकाची कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईची एक टोळी रात्रीच्या वेळी पुणे जिल्ह्यात येऊन जनावरांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करीत होती. दरम्यान, या टोळीला पकडण्यात दिघी पोलिसांना यश आले आहे. एका कारच्या क्रमांकावरून तपास सुरू करून दिघी पोलिसांनी मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरातील विविध भागात पाठलाग करून नऊ आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 25 लाख 20 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये 14 गुन्हे उघड झाले आहेत. आरोपींचा खुनाचा प्रयत्न, दंगल, गाईंची चोरी, तस्करी अशा एकूण 29 गुन्ह्यांमध्ये समावेश आहे. त्यामुळे आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

The post पिंपरी : जनावरे पळवणार्‍या टोळीवर मोका appeared first on पुढारी.

2023-03-19T06:51:22Z dg43tfdfdgfd