चाकूर : तालुक्यातील आष्टामोड येथील पशुवर उपचार करण्यासाठी निघालेल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांचा लातुर-नांदेड महामार्गावर नांदगाव पाटीजवळ मंगळवारी (दि.४) कार व मोटारसायकलच्या अपघातात मृत्यू झाला. याबाबत चाकूर पोलीसांत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलीसांनी दिलेल्या माहीतीवरुन चाकूर तालुक्यातील नांदगाव पाटीजवळ चाकूरकडुन आष्टामोडकडे जाणाऱ्या मोटारसायकला कारने पाठीमागुन जोराची धडक दिली. यामध्ये मोटारसायकलचा चुराडा होऊन यशवंत आनंदराव गरड (वय-५३ रा.अंबुलगा) हे जागीच ठार झाले. या घटनेमुळे पंचक्रोशीतील हळहळ व्यक्त केली जात आहे. सदरील घटनेचा पोलिसांकडुन पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेहाचे आयुष्यमान आरोग्य केंद्र नळेगाव येथे शवविच्छेदन करण्यात आले.
2025-02-04T16:52:01Z