कोर्ट मॅरेज आणि रजिस्टर मॅरेज दोघांमध्ये फरक काय?

मुंबई : विशेष विवाह कायद्याने भारतात न्यायालयीन विवाह कायदेशीर केला आहे. हा कायदा 1954 मध्ये लागू झाला. या कायद्यानुसार, जरी जोडपे वेगवेगळ्या जाती, धर्म किंवा संस्कृतीचे असले तरीही ते एकमेकांशी लग्न करू शकतात. तसेच या कायद्यानुसार, जी व्यक्ती भारतातील नाही किंवा ती व्यक्तीशीही भारतीय व्यक्तीशी लग्न करू शकते. यासाठी जोडपे थेट विवाह निबंधक कार्यालयात विवाह प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात.

पण यासगळ्यात बऱ्याच लोकांना तुम्ही बोलताना ऐकलं असेल की कोर्ट मॅरेज करतोय किंवा रजिस्टर मॅरेज केलंय. तर बऱ्याच लोकांना या दोन्ही गोष्टी सारख्याच वाटतात. पण या दोन्ही ही गोष्टी वेगळ्या आहेत.

आता तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की मग या दोघांमधील नेमका फरक काय? त्यासाठी आपल्याला त्या दोन्हीची प्रक्रिया जाणून घेतली पाहिजे, त्यानंतरच तुम्हाला त्याचा नेमका फरक कळेल.

लग्नासाठी नवरा-बायकोच्या वयात किती अंतर असावं? सायन्स काय सांगतं?

कोर्ट मॅरेजसाठी म्हणजे काय?

तुम्ही पहिल्यांदा डायरेक्ट कोर्टात जाऊन लग्न करता. या लग्नापूर्वी तुम्ही कोणत्याही पद्धतीने लग्न केलेल नसेल, तरच तुम्ही कोर्टात जाऊन लग्न करु शकता. यासाठी तुम्हाला अॅप्लिकेशन द्यावं लागतं आणि एखाद्या जज किंवा मॅजिस्ट्रेट समोर सही करावी लागते त्याला कोर्ट मॅरेज म्हणतात.

ज्याला लग्न करायचं आहे त्यांचे लग्न आधी झालेले नसावे. कारण दुसरा विवाह तेव्हाच वैध असतो जेव्हा त्यांचा घटस्फोट झाला असेल किंवा त्यांच्या जोडीदाराचा मृत्यू झाला असेल.

याप्रक्रियेला ३० दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो आणि लग्नासंबंधीत घरच्यांना किंवा कोणाला आपत्ती आहे का? यासाठी दोघांच्याही घरी नोटीस पाठवली जाते. त्यानंतरच लग्न केलं जातं.

ही नोटीस दाखल केल्याच्या तारखेपासून जोडप्याच्या भागीदारांपैकी एकाने एकाच जिल्ह्यात राहणे आवश्यक आहे.

यानंतर, ही नोटीस निबंधकाद्वारे प्रसिद्ध केली जाते, जेणेकरून जोडप्याच्या कोणत्याही कुटुंबातील सदस्याला किंवा नातेवाइकांना जोडप्याच्या लग्नात काही अडचण असल्यास, ते आपले आक्षेप नोंदवू शकतात.

लग्नाची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांनंतर, कोणत्याही व्यक्तीने आक्षेप न घेतल्यास, जोडप्याचे लग्न होऊ शकते.

लग्नाची नोंदणी करण्यासाठी, दोन्ही भागीदारांनी लग्नाच्या तारखेला तीन साक्षीदारांसह स्वतःला हजर करणे आवश्यक आहे.

मॅरेज रजिस्ट्रेशन म्हणजे काय?

विवाह प्रमाणपत्र हा विवाह सिद्ध करणारा अधिकृत दस्तऐवज आहे. म्हणजे जर तुमचं लग्न आधीच झालं असेल मग ते कोणत्याही पद्धतीने झालेलं असोत. तुम्हाला फक्त ते रजिस्टर करायचं आहे. तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असोत तुम्ही कोणत्याही पद्धतीने लग्न केलेल असोत. तुमच्याकडे त्याचा वॅलिड पुरुवा असेल, तर तुम्ही मॅरेज रजिस्ट्रेशन करु शकता.

हे प्रमाण असेल की तुमचं लग्न झालंय, ज्यामुळे तुम्ही बँक खाते उघडणे, आयुर्विमा पॉलिसी घेणे तसेच बँकेशी संबंधित सर्व कामाचा लाभ घेणे यासाठी वापर करु शकता.

तुम्ही वरील दोन्हीपैकी कोणत्याही मार्गाने लग्न केलंत तरी देखील ते दोन्ही सर्टीफिरेट तुमचं लग्न झालंय हे सिद्ध करण्यासाठी पूरेस आहे.

(Note : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, तुम्ही एखाद्या वकिलाकडून याबाबत सविस्तर माहीत घेऊ शकता)

2023-03-18T08:40:07Z dg43tfdfdgfd