MAHARASHTRA NEWS LIVE UPDATES : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर, धनंजय मुंडेंचं काय होणार? यासह महत्त्वाच्या घडामोडी

Maharashtra Politics LIVE Updates : अंजली दमानियांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही त्यांना उत्तर दिलं आहे. अंजली दमानिया नाहीत तर त्या अंजली बदनामिया आहेत असाही टोला त्यांनी लगावला आहे. हे सगळं वातावरण तापलेलं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बीड दौऱ्यावर आहेत. तर वर्षा पाडणार, वर्षा बंगल्याच्या आवारात मंतरलेली शिंग या चर्चा म्हणजे वेड्यांचा बाजार आहे असंही वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. यासह इतरही महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमांतून असणार आहे.

2025-02-05T04:49:42Z