पुण्यात पोलीस भरतीवेळी २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुणे: राज्यभरात शासनाच्या वतीने पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या भरती प्रक्रियेवेळी मुंबईत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस ग्राऊंडवर देखील भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेवेळी संगमनेर येथील तुषार बबन भालके या २७ वर्षीय तरुणाचा धावताना खाली कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

हेही वाचा : पेपरफुटीविरोधातील कायद्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी… काय आहे म्हणणं?

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर येथील २७ वर्षीय तुषार बबन भालके हा तरुण शिवाजीनगर येथील पोलिस ग्राऊंडवर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आला होता. त्यानंतर तुषार रनिंग करतेवेळी अचानक जमिनीवर कोसळल्याची घटना घडली. त्यावर तुषारला तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान ब्लड प्रेशर कमी झालं आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हार्ट अ‍टॅकमुळे तुषार भालके या तरुणाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

2024-07-06T12:54:22Z dg43tfdfdgfd