- सुजाता बाबर
कावळ्यांमध्ये लहान मुलांप्रमाणे एक विशेष संख्यांत्मक बुद्धिमत्ता असते! कावळे मोठ्याने अंक मोजू शकतात, अशी आश्चर्यकारक माहिती एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. माणसाव्यातिरिक्त इतर प्राणी अंक मोजतात, हे यामुळे प्रथमच समजले आहे! कॉर्वस कोरोन प्रजातीच्या कॅरियन कावळ्यांना जागृत करणारे आवाज ऐकवले, तर ते त्याला प्रतिसाद म्हणून एक ते चार यामधील अंक मोठ्याने मोजतात. हे संशोधन ‘सायन्स’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
विशिष्ट संख्येने स्वर तयार करण्यासाठी संख्यात्मक क्षमता आणि स्वर नियंत्रण यांचा मेळ असणे आवश्यक असतो. , कावळे जाणीवपूर्वक स्वरांची एक निर्देशित संख्या तयार करू शकतात. यासाठी ते अंदाजे/ अॅप्रोक्झिमेट संख्या प्रणाली वापरतात. ही प्रणाली आपल्या आकलनशक्तीचा एक भाग आहे, जो संपूर्ण आयुष्यभर सक्रिय असतो. संख्या आणि त्यांच्या संबंधांबद्दल पटकन आणि अंगभूत समज निर्माण होते. उदा. एखाद्या कागदावर निळे विरुद्ध पिवळे ठिपके किती आहेत किंवा जेवणाच्या टेबलावर किती आवाज ऐकू येतात, अशा बाबतीत चटकन संख्या लक्षात येते.
मधमाशा, सिंह, बेडूक आणि मुंग्या अशा प्राण्यांना संख्यात्मक ज्ञान असते. परंतु, अंक मोठ्याने मोजता येतात हे मात्र कोणत्याही प्राण्यांच्या बाबतीत दिसले नव्हते. यासाठी संशोधकांनी तीन कॅरियन कावळ्यांची निवड केली. याचे कारण म्हणजे, हे कावळे बोलण्याची उत्कृष्ट क्षमता आणि शून्यासारख्या जटिल गणिती संकल्पनांच्या आकलनासाठी प्रसिद्ध आहेत. यांना अरब भाषेतील काही दृश्ये क्रमाने दाखविली आणि वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज विशिष्ट क्रमाने ऐकवले. चाचण्या केल्यावर कावळ्यांना समजले की, प्रत्येक संच एक ते चार संख्येशी संबंधित आहे. त्याप्रमाणे त्यांनी आवाज काढला. स्वर बाहेर काढल्यानंतर (म्हणजे प्रत्येक चित्रांच्या संचासाठी किंवा वाद्यांच्या आवाजाच्या संचासाठी चार वेळा काव काव ओरडणे) एक ते चार मधील त्या त्या संख्येशी निगडीत चित्र उचलणे किंवा वाद्यातील स्वर ओळखणे याचे कावळ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. कावळ्यांनी ते बरोबर ओळखून तितक्या वेळा आवाज काढला तर त्या कावळ्याला खाऊ रूपात बक्षीस दिले.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर या कावळ्यांनी अचूक प्रतिसाद दिला आणि तोही अपेक्षेपेक्षा वेगाने. जेव्हा त्यांचा प्रतिसाद चुकत होता, तेव्हा ते तुलनेने जवळ असलेल्या संख्यांमध्ये चुका करीत होते, म्हणजे तीनऐवजी चार किंवा चार ऐवजी तीन. कावळ्यांमधील ही क्षमता लहान मुलांच्या गणन कौशल्यांप्रमाणे आहे. कावळ्यांमध्ये अंकगणित शिकण्यापूर्वी आणि मोजणीच्या उत्क्रांतीपूर्वीची ही अवस्था असू शकते! आणि हा खरेच उत्क्रांतीमधील पहिला टप्पा असेल तर?
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-08-01T07:19:21Z dg43tfdfdgfd