CBI RECRUITMENT 2024: सीबीआयमध्ये भरती सुरू, अर्ज करण्यासाठी 'ही' शैक्षणिक पात्रता; अर्जाची लिंक बातमीमध्ये

CBI Mumbai Vacancy 2024: सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन मुंबई येथे विशेष सरकारी वकील या पदाची जागा रिक्त असून त्यासाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी १२ ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख असून उमेदवारांनी त्यांचे अर्ज संपूर्ण भरून योग्य ती प्रमाणपत्रे जोडून या तारखेच्या आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज जमा करणे आवश्यक आहे.

CBI Mumbai Bharti 2024: CBI म्हणजेच सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन मुंबई येथे रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सीबीआयमधील ही रिक्त जागा विशेष सरकारी वकील या पदाची आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन सोबत विशेष सरकारी वकील म्हणून रुजू झाल्यानंतर मुंबई, कल्याण, ठाणे, पुणे, नागपूर ही ठिकाणे नोकरीची ठिकाणे असतील.

या भरतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने त्यांचे अर्ज सदर करणे आवश्यक आहे. अर्ज जमा करण्यासाठी दिनांक १२ ऑगस्ट २०२४ ही अंतिम तारीख ठरवून देण्यात आली आहे.

CBI Mumbai, Eligibility Criterias: पात्रतेचे निकष.

  • एल एल बी पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक.
  • बार काऊन्सिल सोबतचे एडवोकेट म्हणून एनरोलमेंट केलेले प्रमाणपत्र आवश्यक
  • गुन्हेगारीचे खटले सेशन कोर्ट मध्ये हाताळण्याचा अनुभव असणे आवश्यक
  • भारत सरकार द्वारे वेळोवेळी केल्या जाणाऱ्या नियम व अटी यांचे पालन करून काम करण्याची असणे आवश्यक.
  • गुन्हेगारीचे खटले सांभाळण्यात वकील म्हणून कमीत कमी दहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
सीबीआयमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून रिक्त असलेल्या जागेवर करण्यात येणारी नेमणूक ही ३ वर्षांसाठी असेल.

CBI Mumbai, Important Documents: कोणती कागदपत्रे आवश्यक?विशेष सरकारी वकील या पदासाठी अर्ज करताना अर्ज सोबत पुढील कागदपत्रे जोडावीत-

  • शैक्षणिक पात्रतेची हमी देणारी प्रमाणपत्रे
  • बार कौन्सिल सोबत एडवोकेट म्हणून एनरोलमेंट केलेले प्रमाणपत्र
  • सेशन कोर्ट मध्ये गुन्हेगारीचे खटले हाताळण्यासंबंधीची कागदपत्रे
  • गुन्हेगारीचे खटले सेशन कोर्ट मध्ये हाताळण्यासंबंधीची कागदपत्रे
  • जे महत्त्वाचे खटले हाताळले त्यांची यादी
वरती नमूद केलेली सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे ही ऑनलाइन लिंकच्या माध्यमातून जमा करणे आवश्यक आहे. ऑफलाईन पद्धतीने सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत तसेच नेमून दिलेल्या अंतिम तारखेनंतर म्हणजेच १२ ऑगस्ट २०२४ नंतर जमा केलेले अर्ज, तेच अपूर्ण अर्ज देखील या भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन मुंबई यांच्या https://cbi.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवता येईल. संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर समोर उघडल्या जाणाऱ्या होम पेजवरील रिसोर्सेस हा पर्याय निवडल्यानंतर त्यात वेकंसी हा पर्याय निवडायचा आहे. वेकन्सी पर्याय निवडल्यानंतर तेथे सीबीआयमध्ये सुरू असलेल्या भरती विषयीचे नोटिफिकेशन तुम्हाला तपासता येईल. सीबीआयमध्ये सुरू असलेल्या भरती विषयी https://cbi.gov.in/vacancies इथे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-08-01T06:53:18Z dg43tfdfdgfd